Kaali Poster Cotroversy: चित्रपट निर्मातीने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार, एफआयआर रद्द करण्याची केली मागणी; काय झालं नेमकं कोर्टात?

चित्रपट निर्मात्यांनी विविध राज्यांमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआर रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Kaali Poster
Kaali PosterSaam Tv
Published On

Kaali Poster Cotroversy: 'काली' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हिंदू देवीचे विचित्र पद्धतीने चित्रण केल्याची चर्चा सर्वत्र होत होती. चित्रपट निर्मात्यांनी विविध राज्यांमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआर रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक देवी सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. हा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर खुप वाद निर्माण झाला होता.

Kaali Poster
Urfi Javed Video: नुसते पंख लावून उर्फीने केले शूट, व्हिडिओ पाहून तुम्हाला बसेल ४४० व्होल्टचा करंट

या पोस्टरवर दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्याने या एफआयआर अंतर्गत फौजदारी कारवाईवर स्थगित करण्याची मागणी ही केली आहे.

सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी.एस.नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख तात्काळ यादीत करण्यात आला होता. मणिमेकलाई यांच्या याचिकेवर २० जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

Kaali Poster
Miss Universe 2022: अमेरिकेची गेब्रियल ठरली 'मिस युनिव्हर्स २०२२' ची मानकरी...

शुक्रवारी, 14 जानेवारी रोजी लीना यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडले होते. लीनाने दाखल केलेल्या याचिकेत आपल्याविरुद्ध असलेले सर्व एफआयआर रद्द करण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे. आपल्या युक्तिवादात लीना म्हणाल्या, मला चित्रपट निर्माती म्हणून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायच्या नाहीत.

Kaali Poster
Viral Video: करमत न्हाई गं...पूजा सावंतच्या दिलखेचक अदा बघून म्हणाल, लावणीचा ठसकाच!

सोबतच लीना पुढे म्हणतात, माझा उद्देश केवळ देवीची प्रतिमा सादर करणे हा होता. हा माहितीपट देवीच्या व्यापक विचार प्रतिबिंबित करतो. अशा स्थितीत लीनाने आता मध्य प्रदेशातील रतलाम, लखनौमधील हजरतगंज, उत्तराखंडमधील हरिद्वार, भोपाळ, इंदूर आणि दिल्ली येथील जिल्हा न्यायालयात तिच्याविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईला आव्हान दिले आहे.

Kaali Poster
Pathaan: जगभरात शाहरूखच्या 'पठान'चा डंका, चित्रपटाचा ट्रेलर जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफावर

चित्रपटाचा हा पोस्टर प्रदर्शित होताच तिला जीवे मारण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी देणारे अनेक फोन कॉल्स आले होते. लीनाचे म्हणणे आहे की, तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमुळे तिचा छळ, बोलण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com