Miss Universe 2022: जगभरातील किती मुलींचे मिस युनिव्हर्स होण्याचे स्वप्न आहे माहीत नाही, पण ते स्वप्न साकार करण्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि अनेकांची दूरदृष्टी आहे. अशीच एक अमेरिकेतील एका युवतीने हे स्वप्न बाळगत पूर्ण केले आहे. अमेरिकेतील आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' (Miss Universe 2022) या स्पर्धेची विजेती ठरली आहे.
15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या कार्यक्रमात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या विजेती म्हणून जाहीर करण्यात आली. अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला. 'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या. भारताची दिविता राय टॉप 16 मध्ये पोहोचली पण टॉप-5 मध्ये तिला स्थान मिळाले नाही.
भारताच्या हरनाज संधूने यावेळी आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. या स्पर्धेची मिस डोमिनिकन रिपब्लिक एंड्रीना मार्टिनेझ ही दुसरी रनर-अप ठरली, तर पहिली रनर-अप मिस व्हेनेझुएला अमांडा दुडामेल ही ठरली. व्हेनेझुएला, अमेरिका, प्यूर्टो रिको, क्रयुरासाओ आणि डोमेनिकन रिपब्लिक या देशांच्या स्पर्धकांनी टॉप-5 स्पर्धांच्या यादीत स्थान मिळवले.
कोण आहे मिस युनिव्हर्स?
आर बोनी गॅब्रिएल ही 28 वर्षाची आहे. ती ह्यूस्टन, टेक्सास (Texas) येथील फॅशन डिझायनर आहे. आर बोनी गॅब्रिएलचा जन्म 20 मार्च 1994 रोजी सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला. तिची आई अमेरिकन आणि वडील फिलिपिनो आहेत.
मुकूटाचे वैशिष्ट्य
मिस युनिव्हर्ससाठी यंदा सुप्रसिद्ध लग्जरी ज्वेलर्स Mouawad ने हा मुकूट डिझाईन केला आहे. या मुकूटाची किंमत जवळपास ४६ कोटी रुपये इतकी आहे. यात रत्नखचित हिरे आणि नीलमही लावलेले आहेत. सोबतच या मुकुटात पायाच्या आकाराचा एक मोठा नीलमही जोडलेला असून त्याभोवती हिरे लावलेले आहेत. या मुकूटात एकूण ९९३ स्टोन आहेत. ज्यात ११०.८३ कॅरेट नीलम आणि ४८.२४ कॅरेट पांढरे डायमंड आहेत. मुकूटाच्या सर्वात वरच्या बाजूला रॉयल ब्लू रंगाचा नीलम ४५.१४ कॅरेट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.