Pathaan: जगभरात शाहरूखच्या 'पठान'चा डंका, चित्रपटाचा ट्रेलर जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफावर
Pathaan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठान' (Pathaan) चित्रपटाचा ट्रेलर होताच सोशल मीडियावर चांगलीच सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच राजकारण्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला होता. पण ट्रेलर प्रदर्शित होताच बराच वाद सध्या तरी शमलेला दिसून येत आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफा या टॉवरवर झळकणार आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खान (King Khan) सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने 'इंटरनॅशनल लीग टी 20' साठी (I L T20) दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.
'पठान' या बहुचर्चित आणि बिगबजेट सिनेमाच्या ट्रेलरचं आज जगातील सर्वात उंच इमारतीवर बुर्ज खलिफावर स्क्रीनिंग होणार आहे. यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'पठान' या सिनेमाचे सध्या जगभरात जोरदार प्रमोशन सुरू असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा नक्कीच धुमाकूळ घालेल यात शंका नाही.
शाहरुख हा चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक आहे. शाहरुखचे चाहते आता पठानच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ची जय्यत तयारी करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचे 50000 हून अधिक चाहते 'पठान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहेत. SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठान'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.
SRK युनिव्हर्स फॅन क्लबचे सह-संस्थापक यश परायणी यांनी सांगितलं, 'SRK युनिव्हर्स 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठान' च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करत आहे. यामध्ये 50 हजारांहून अधिक चाहते सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे. याद्वारे आम्ही सुमारे 1 कोटी रुपयांचे बुकिंग करू शकतो.
शाहरुखच्या दमदार कमबॅकचे सेलिब्रेशन फक्त एका दिवसासाठी मर्यादित नाही, तर प्रजासत्ताक दिनानंतर येणाऱ्या वीकेंडलाही लोकांनी 'पठान'ला बुक करणे हाच त्याचा उद्देश असेल. हा सिनेमा पहिला भारतीय IMAX फॉरमॅटमधील चित्रपट आहे. सर्व शहरांमध्ये बहुतेक चित्रपटाची बुकिंग IMAX शोसाठी असेल.'
शाहरुखचे चाहते 'पठान' (Pathaan) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी देखील अनेकदा सोशल मीडियावर झाली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.