Ved Box Office Collection: 'वेड' चित्रपटाचा चौदाव्या दिवशी सुद्धा कोट्यावधींचा गल्ला

बॉक्स ऑफिसवर 'वेड' चित्रपटाचे जोरदार कलेक्शन सुरु आहे.
Ved Marathi Movie Box Collection
Ved Marathi Movie Box Collection Instagram/ @riteishd

Ved Box Office Collection On 14th Day: रितेश देशमुख दिगदर्शित 'वेड' चित्रपटाने महाराष्ट्राला खरंच वेड लावले आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे जोरदार कलेक्शन सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज दोन आठवडे झाले आहेत.

'वेड' चित्रपट ३० डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेराव्या दिवशी या चित्रपटाचे एकूण कॅलेक्शन ३८. ९७ करोड इतके आहे. चौदाव्या दिवस म्हणजे गुरुवारी (१२ जानेवारी २०२३) 'वेड'चे कलेक्शन १.२० करोड इतके होते.

Ved Marathi Movie Box Collection
Lisa Marie Presley: मायकल जॅकसनची एक्स पत्नी लिसा मेरी प्रेस्लीचे निधन

'वेड' चित्रपटाचे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन २०. ६७ करोड इतके होते. तर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४०. १७ करोडचा गल्ला जमावाला आहे. 'वेड' चित्रपटाचे एकूण बजेट १५ करोड होते. कलेक्शनच्या बाबतीत 'वेड' चित्रपटने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील एक ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला आहे.

वेड चित्रपट हिट होण्याची अनेक करणे आहेत. हा चित्रपट रितेश आणि जेनेलियाचा पहिला मराठी चित्रपट आहे. जेनेलियाने या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे, तर रितेशने या चित्रपटाच्या माध्य्मातून त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरूवात केली आहे. या चित्रपट सलमानचा केमिओ देखील प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे कारण आहे. अशोक सराफ आणि विद्याधर जोशी यांची या चित्रपटातील भूमिका देखील खूप खास आहे.

रितेश सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट काकुडामध्ये आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत साजिद खानच्या 100% कॉमेडी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com