सलमान कोपऱ्यात बसून रडत असेल! 'चुनरी चुनरी' गाण्याच्या रिमेकवरून वरुण धवन ट्रोल

Bollywood Movie News: 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटातील गाणं रिलीज झालं आहे. मात्र सोशल मीडियावर या गाण्यावर नेटकरी नाराज झाले आहेत.
 entertainment news
entertainment news Saam Tv
Published On

Hai Jawani Toh Ishq Hona Hai Movie: बॉलिवूडचा आगामी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटातील 'चुनरी चुनरी' गाणं रिलीज केलं. या गाण्यामध्ये अभिनेता वरूण धवनसह अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे दिसत आहेत. या गाण्यातील डान्स, अदा यामुळे खरे लक्ष वेधून घेतले असले तरी हे गाणं चर्चेचा विषय ठरला आहे. हे गाणं पाहिल्यानंतर काहींना सलमान खान आणि सुष्मिता सेनची बिवी नं -2 मधली जोडी आठवली आहे.

सोशल मीडियावर सध्या 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटातलं 'चुनरी चुनरी' गाणं ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यावरून नेटकऱ्यांनी वरूण धवनला चांगलच धारेवर धरलं आहे. ट्रोल केलं आहे. त्यांनी हे गाणं अभिनेता सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्या गाण्याचा रिमेक आहे असं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांना हे गाणं आवडलं नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गाण्याचा रिमेकवर नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी कमेटं करत 'एका प्रसिद्ध गाण्याला श्रद्धांजली', तर दुसऱ्याने, 'सलमान आणि सुष्मिताशी तुलना होऊ शकत नाही.' तर आणखी एका युजर्सने, 'सलमान कोपऱ्यात बसून रडत असेल' अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 entertainment news
Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सुपरहिट! मराठीसोबत हिंदी सिनेमांनाही टाकले मागे, वाचा छप्परफाड कमाई

सलमान खानने उडवली खिल्ली

नुकताच एका कार्यक्रमात, सलमानने सर्वांसमोर कॅमेऱ्यामध्ये पोज देत गाण्याच्या रिमेकवरून वरूण धवनला डिवचलय. 'त्याने माझं अजून एक गाणं केलं' असं म्हटलं आहे, सलमानचे हे बोलणे ऐकून वरुण धवन लाजला आणि म्हणाला 'असून दे भाऊ' यावर सलमान खान जोरजोरात हसताना दिसतो आहे.

 entertainment news
Deool Band 2 Collection : स्वामी नामाचा गजर! 'देऊळ बंद २'नं 'राजा शिवाजी' ला पछाडलं; प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर जलवा, कमाई वाचून बसेल धक्का

'चुनरी चुनरी' वर वाशू भगनानी यांचा आक्षेप

'चुनरी चुनरी' या गाण्याच्या रिमेकमुळे ज्येष्ठ निर्माते वाशू भगनानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यांचे निर्माते यावरून मला भेटायला तयार नाहीत असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी, माझा मुलगा या चित्रपटात आहे आणि त्याने मला येऊन सांगायला हवे होते. दुसऱ्या एका चित्रपटासाठी तुम्ही सेम गाणं कसं रिलीज करू शकता? इंडस्ट्रीमध्ये नैतिकता असायला हवी असं म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, 'डेव्हिड माझ्या भावासारखा आहे. आम्ही दोघेही सोबत एकत्र जेवलोय. मी त्यांच्यासाठी माझे जीवन समर्पित केलं आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व काही ठीक असले तरी भावनिकदृष्टया आम्ही सर्वंच नाराज आहोत.

 entertainment news
Movie On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातवर येणार चित्रपट; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका, काळ्या कृत्यांचा मोठ्या पडद्यावर खुलासा

कधी होणार चित्रपट रिलीज

'है जवानी तो इश्क होना है' चा ट्रेलर खास होता. कौटुंबिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना सस्पेन्स आणि कॉमेडी याची एकत्र जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. लवकरच येत्या ५ जूनला सिनेमागृहात चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात वरूण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com