मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा बिग बॉस मधील गेम पाहून चाहत्यांना तर आश्चर्याचा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी वर्षा उसगांवकर या मराठी मालिका 'शिवा'मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आता त्या एका नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. याची खास झलक कलर्स मराठी वाहिनीने दाखवली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून, गोल्डन ज्वेलरी घालून एक अभिनेत्री पाहायला मिळत आहे. तिच्या कातिल अदाल चाहत्यांना वेड लावणाऱ्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही सुंदर अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर आहेत. आता पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर नवीन मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
प्रोमोला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी, सिनेसृष्टीची 'सदाबहार अभिनेत्री' लवकरच तुमच्या भेटीला येतेय! तिला भेटायला तुम्ही तयार आहात ना?" व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी वर्षा ताईला ओळखले आहे. तिला शुभेच्छा देताना आणि तिच्या लूकचे, सौंदर्याचे कौतुक करताना चाहते दिसत आहेत.
'आई तुळजाभवानी' मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृणाल साळुंखेने एक खास पोस्ट केली आहे. तिने वर्षा उसगांवकर आणि अशोक मामा (Ashok Saraf) यांची भेट घेतली आहे. वर्षा उसगांवकर आणि अशोक मामा यांना एकत्र पाहून दोघे पु्न्हा एका पडद्यावर दिसणार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे 'अशोक मा मा' मालिकेत वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री होऊ शकते. अशोक सफरा-वर्षा उसगांवकर यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.