Manasvi Choudhary
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक वर्षा उसगांवकर.
वर्षा उसगांवकर यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ मध्ये गोव्यामध्ये कोकणी कुटुंबात झाला.
डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालय पणजी येथून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी कॉमर्स ग्रॅज्युएट शिक्षण घेतले.
गंमत जंमत या मराठी चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केले ते मागे वळून पाहिलेच नाही.
शुभ मंगल सावधान, पटली रे पटली, सवत माझी लाडकी, सुहासिनी, हमाल दे धमाल, रेशीमगाठी, भुताचा भाऊ, बायको चुकली स्टँडवर, बाप रे बाप, पैज लग्नाची हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
आता वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत.