Shocking News: 'गदर २' पाहायला गेला अन् थिएटरमध्येच कोसळला; तरुणाचा जागेवरच गेला जीव, धक्कादायक कारण समोर

Gadar 2 Movie Young Man Heart Attack: गदर २ पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या थिएटरच्या गेटवरच मृत्यू झाला आहे.
Uttar Pradesh News Young man died of heart attack while watching recently released movie gadar 2
Uttar Pradesh News Young man died of heart attack while watching recently released movie gadar 2Saam TV
Published On

Gadar 2 Movie Young Man Heart Attack: अभिनेता सनी देओलचा गदर २ चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. दरम्यान, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अशातच उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Uttar Pradesh News Young man died of heart attack while watching recently released movie gadar 2
Sangli Food Poisoning: शिल्लक अन्न खाऊ घातले... आश्रम शाळेतील १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

गदर २ पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या थिएटरच्या गेटवरच मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथील सिनेमा हॉलमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अष्टक तिवारी (वय ३२ वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे. थिएटरच्या गेटवरच एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अष्टक हा कोतवाली ठाणे हद्दीतील द्वारकापुरी परिसरातील रहिवासी होता. शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता अष्टक तिवारी (32 वर्षे) हा गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी फन सिनेमा हॉलमध्ये गेला होता.

Uttar Pradesh News Young man died of heart attack while watching recently released movie gadar 2
Jalna Crime News: मी मेल्यावर तू रडशील का?, मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुणाने संपवलं जीवन

फोनवर कोणाशी तरी बोलत असताना सिनेमा हॉलच्या गेटजवळ पोहोचताच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. तेथे उपस्थित लोकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ हॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या व्हिडीओत फोनवर बोलत असताना अष्टक कसा खाली पडला हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या गार्ड आणि बाऊन्सर्सनी अष्टकच्या घरी फोन करत त्याच्या कुटुंबियांना घटनेबाबत माहिती दिली. घाईघाईत नातेवाइकांनी सिनेमागृह गाठून त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com