Jalna Crime News: मी मेल्यावर तू रडशील का?, मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुणाने संपवलं जीवन

Jalna Ghansawangi News: मी मेल्यावर तू रडशील का ? असे स्टेट्स ठेवून एका 22 वर्षीय तरुणांनी गळफास आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
Jalna Young Man Ended Her Life Journey:
Jalna Young Man Ended Her Life Journey:Saam TV

Jalna Young Man Ended Her Life Journey: 'यहा जीने से ज्यादा मरने में विश्वास है’, मी मेल्यावर तू रडशील का ? असे स्टेट्स ठेवून एका 22 वर्षीय तरुणांनी गळफास आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. विलास मोरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Jalna Young Man Ended Her Life Journey:
Talathi Exam Scam: तलाठी परीक्षा घोटाळ्यातील मुख्य संशयिताच्या अडचणीत वाढ; पोलिस तपासात मोबाईलमध्ये सापडली धक्कादायक माहिती

घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत विलासचा मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विलासचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास हा मूळचा घनसावंगी येथील रहिवाशी आहे.

गेल्या काही दिवसापासून तो तीर्थपुरी (Jalna News) गावात चहाचे स्टॉल चालवत होता. अत्यंत कष्टाळू आणि होतकरू तरुण म्हणून गावातील लोक त्याला ओळखत होते. चहा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सोबत विलासचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे लोक ही त्याच्या स्टॉलवर चहा घेणे पसंद करायचे.

Jalna Young Man Ended Her Life Journey:
Chhagan Bhujbal: शरद पवारांवरील टीकेनंतर बीडच्या सभेत गोंधळ; भुजबळांनी दोन मिनिटातच भाषण संपवलं, नेमकं काय घडलं?

दरम्यान, रविवारचा दिवस असल्याने विलास हा घरीच होता. यावेळी त्याने दुपारच्या सुमारास 'यहाँ जीने से ज्यादा मरने में विश्वास है’, आणि त्या नंतर त्यांनी मी मेल्यावर तू रडशील का ? अस स्टेट्स ठेवत घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खबळ उडाली.

विलास याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात घटनेची नोद करण्यात आली आहे. विलासच्या अशा अचानक निघून जाण्याने रांजणीसह घणसांवगी आणि तीर्थपुरी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com