Talathi Exam Scam: तलाठी परीक्षा घोटाळ्यातील मुख्य संशयिताच्या अडचणीत वाढ; पोलिस तपासात मोबाईलमध्ये सापडली धक्कादायक माहिती

Nashik News :
Talathi Exam Scam
Talathi Exam ScamSaam tv
Published On

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी तलाठी परीक्षा झाली. दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्राजवळ हायटेक (Exam Scam) यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी परीक्षेच्या पेपरची माहिती देताना (Nashik) नाशिक पोलिसांनी गणेश गुसिंगे याला ताब्यात घेतले होते. यात पोलिसांना तपासादरम्यान आणखी काही माहिती हाती लागलीय. (Maharashtra News)

Talathi Exam Scam
Jalgaon Accident News: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोन युवक ठार

नाशिकच्या तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्न पत्रिका सापडल्या आहेत. तसेच गणेशने इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस (Police) तपासात उघड झाले असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहे. परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी गणेश गुसिंगे याच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

Talathi Exam Scam
Ramdas Athawale Statement: भाजपच्या चिन्हावर आता उभे राहणे योग्य नाही; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा तपास सुरू असताना DMER परीक्षेचा निकाल लागला. त्या निकालामध्ये गणेश गुसिंगे याच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या परीक्षेत घोटाळा झालाय का, याचाही तपास केला जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाची नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून त्या दृष्टीने तपास सुरू केलाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com