वरणगाव (जळगाव) : शिरसाळे येथील मारोतीरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला ट्रकने धडक (Jalgaon) दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी (२६ ऑगस्ट) पहाटे महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ घडली. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात (Accident) बचावले. चौघेही मित्र सावदा येथील रहिवासी आहेत. (Latest Marathi News)
सावदा येथील भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार, भूषण चंद्रकांत कुंभार व भूषण किशोर पुर्भी हे चार शालेय मित्र शिरसाळे (ता. बोदवड) येथे मारोती मंदिरात देवदर्शनासाठी दोन दुचाकीद्वारे हतनूर धरणमार्गे निघाले होते. मुक्ताईनगरकडे जात असताना महामार्गावरील बोहर्डी गावाच्या अवघ्या काही अंतरावर मागील बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने भास्कर कुंभार याच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे झालेल्या आवाजाने पुढील दुचाकीवर जात असलेल्या भूषण पुर्भी यांनी आपली दुचाकी माघारी फिरवून आपल्या अपघातग्रस्त मित्रांजवळ धाव घेऊन आक्रोश सुरू केला.
अपघाताची (Varangaon) माहिती मिळताच बोहर्डी गावातील रवींद्र पाटील व नीलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना रिक्षा व दुचाकीद्वारे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉ. क्षितीजा हेंडवे यांनी भास्कर कुंभार याला मृत घोषित करून जखमी लखन कुंभार याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र, त्याचाही भुसावळातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ व उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनीही सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
दोघे मित्र थोडक्यात बचावले
मागील मित्राच्या दुचाकीच्या अपघाताचा आवाज येताच पुढे जाणाऱ्या भूषण पुर्भी व भूषण चंद्रकांत कुंभार या मित्रांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आपली दुचाकी माघारी फिरवली. यावेळी ट्रकचालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थोडक्यात बचावले. यावेळी चालकाने ट्रकसह घटना स्थळावरून भरधाव वेगात निघून गेला. अपघातातील मृत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. त्याने देवदर्शनासाठी मालकाची दुचाकी घेतली होती. मात्र, क्रूर काळाने दोन्ही मित्रांवर झडप घालून त्यांना कुटुंबापासून हिरावून नेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.