Ramdas Athawale Statement: भाजपच्या चिन्हावर आता उभे राहणे योग्य नाही; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Satara News : भाजपच्या चिन्हावर आता उभे राहणे योग्य नाही; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv
Published On

सातारा : मागच्या वेळी भाजपच्या चिन्हावर आमचे ५ उमेदवार उभे होते. त्यापैकी २ उमेदवार निवडून आले. परंतु आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत (BJP) भाजपच्या चिन्हावर उभे राहणे योग्य नाही. मी तीन वेळा जेव्हा काँग्रेसच्या आघडीबरोबर निवडून आलो. तेव्हा आरपीआयच्या (Satara) चिन्हावर निवडून आलो. त्यामुळे यावेळी २ लोकसभा आणि ८-१० विधानसभेच्या जागा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे आरपीआयचे ५ ते ६ आमदार निवडून येतील तशी आमची बांधणी सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. (Tajya Batmya)

Ramdas Athawale
Jalgaon Accident News: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोन युवक ठार

साताऱ्यात आज आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने खंत व्यक्त केली. 

Ramdas Athawale
Jalna Crime News: जालन्यात तरुणाची हत्या; मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मागत होता मदत

आरपीआयकडे दुर्लक्ष करू नये

सर्व घटकपक्षांशी एकत्र बसून आम्ही चर्चा करू. दलीत मतांची निवडून येण्याची नितांत आवश्यकता आहे. महराष्ट्रातील माझा गट प्रभावी आहे. त्यामुळे महायुतीने दलीत मतांना बरोबर घेण्यासाठी आरपीआयला डावलून चालणार नाही. महायुतीतील सर्व नेत्यांना आवाहन आहे; भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ज्याप्रमाणे चर्चा होते. तशी आरपीआयची चर्चा होत नाही. आरपीआयला सोबत घेतल्याशिवाय सत्ता आणणे अशक्य आहे. ही भावना लक्षात घेऊन महायुतीच्या नेत्यांनी आरपीआयकडे दुर्लक्ष करू नये. 

Ramdas Athawale
Praniti Shinde Banner: प्रणिती शिंदेचे भावी खासदार म्हणून सोलापुरात झळकले बॅनर; प्रणितीने व्यक्त केली नाराजी

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सातारा दौऱ्यावर असून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाबाबत सूचक वक्तव्य केलंय. २००९ मध्ये माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. बहुजन समाजामध्ये ऐक्य निर्माण करणे, हे बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक नेते मंडळी भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे मी पुन्हा इच्छुक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलय. माझी २०२६ पर्यंत राज्यसभा असल्यामुळे शिर्डीची जनता मला स्वीकारेल; असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com