Marathi Actress : ॲक्शन सीन करताना मालिकेच्या नायिकेला दुखापत; नाकावर पट्टी लावून करतेय शूटिंग, पाहा VIDEO

Mahima Mhatre Injured On Serial Set : मराठी अभिनेत्रीला मालिकेचे शूटिंग करताना दुखापत झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधित बातमी चाहत्यांना दिली आहे.
Mahima Mhatre Injured On Serial Set
Marathi Actresssaam tv
Published On
Summary

झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.

मालिकेतील नायिकेला शूटिंग करताना दुखापत झाली.

नाकावर पट्टी लावून अभिनेत्री मालिकेचे शूटिंग करत आहे.

सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मीरा-अथर्वची लव्ह स्टोरी रंजक वळणावर आली आहे. दोघांमध्ये प्रेमाचे नाते खुलू लागले आहे. प्रेक्षक मीराला भरभरून प्रेम देत आहे. मालिकेत मीराची भूमिका महिमा म्हात्रेने साकारली आहे. काही दिवसांपासून मीरा मालिकेत दिसली नाही. तसेच अलिकडच्या एपिसोडमध्ये महिमाच्या नावावर लागलेल्या पट्टीने आणि डोळ्यांचा बदललेला रंगाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिमा नेमकं झालं काय, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

अखेर महिमा म्हात्रेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून यासंबंधित माहिती चाहत्यांना दिली आहे. व्हिडीओत सांगितल्यानुसार, महिमाला मालिकेमध्ये ॲक्शन सीन शूट करताना दुखापत झाली. ती पडली आणि तिच्या नाकाला, कपाळाला लागले. डॉक्टरांनी मेकअप न करण्याचा सल्ला दिल्यामुळे महिमा पट्टी लावून शूट करत आहे. तसेच तिच्या नाकाला झालेली जखम डोळ्याच्या जवळ आहे. ज्यामुळे डॉक्टरांनी तिला लेन्स लावण्यास मनाई केली. त्यामुळे महिमा तिच्या खऱ्या डोळ्यांनी शूट करत आहे. ज्यामुळे मालिकेत डोळ्यांचा रंग बदललेला दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी महिमाने हात जोडून चाहत्यांना विनंती केली की, मीरामधील हा छोटासा बदल स्वीकारून तिच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम कराल. या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिला पाठिंबा देत आहेत. तर तिच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत. 'तुला जपणार आहे' मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री 10.30 वाजता पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. मालिकेत आता कोणते रंजक वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महिमा म्हात्राने 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' या मालिकेत काम केले आहे. मालिकेत तिने सानिका हे पात्र साकारले. तर 2023 साली रिलीज झालेल्या आंख मिचौली (Aankh Micholi) चित्रपटात देखील ती झळकली आहे. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक कायम कौतुक करतात. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Mahima Mhatre Injured On Serial Set
Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com