Zee Marathi : झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' या नव्या हॉरर मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Zee Marathi Tula japnar aahe : झी मराठी वाहिनी लवकरच नवीन मराठी हॉरर मालिका "तुला जपणार आहे" प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात एका आई आणि तिच्या मुलीची कहाणी दाखविण्यात येणार आहे.
Zee Marathi New Serial Tula Japnar Aahe actress Pratiksha Shivankar
zee marathi new serial tula japnar aheSaam Tv
Published On

Zee Marathi : झी मराठी वाहिनी रौप्यवर्ष साजरा करत आहे. या निमित्ताने झी मराठीवर अनेक नवीन मलिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठी प्रत्येक मालिकेतून प्रेक्षकांसाठी नवीन आशय घेऊन येत असतो. अशीच एका नवीन आशयाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला झी मराठी घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठीने नव्या मालिकांची घोषणा केली आणि त्याचबरोबर त्याची झलकसुद्धा शेअर केली होती. 'लक्ष्मी निवास','तुला जपणार आहे' अशा या दोन नव्या मालिकांची शीर्षक आहेत. 'लक्ष्मी निवास' ही मालिका २३ डिसेंबर २०२४ पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. मात्र, 'तुला जपणार आहे' या मालिकेबद्दल कोणतीच अपडेट चॅनलने शेअर केली नव्हती. आता या मालिकेबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेची झलक काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आली. ही हॉरर मालिका असून 'दिसत नसली तरीही असणार आहे...तुला जपणार आहे' असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं होतं. या प्रोमोमध्ये जंगलातील एका वाड्यात एक लहान मुलगी आणि एक साडी नेसलेली बाई दाखवण्यात आली. एका आरश्यासमोर त्या दोघीही उभ्या आहेत पण आरश्यात फक्त लहान मुलीचे प्रतिबिंब दिसत आहे. ही कधी न दिसणारी आणि तरीही जाणवणारी ही सावली नेमकी कोणाची? 'तुला जपणार आहे' लवकरच ! असं कॅप्शनने हा प्रोमो शेअर करण्यात आला होता. प्रोमो शेअर केला तेव्हा मालिकेतील कास्ट गुलदस्त्यातच ठेवण्यात आले होते. मात्र आता या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आले आहे.

Zee Marathi New Serial Tula Japnar Aahe actress Pratiksha Shivankar
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा २'च्या प्रेक्षकांमध्ये ७० टक्क्याने वाढ; नेटकरी म्हणाले पीआर स्टंट...

अभिनेते प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात काम करणारी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर झी मराठीच्या आगामी 'तुला जपणार आहे' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. याआधी प्रतीक्षाने सोनी मराठी 'जिवाची होतिया काहिली', 'अंतरपाट' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

प्रेक्षकांना मालिकेची उत्सुकता

सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अलिकडेच झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सुरू झाली. त्यानंतर ‘लक्ष्मी निवास’ ही नवी मालिकाही लवकरच सुरू होणार आहे. अशातच झी मराठीने चाहत्यांसाठी ही आणखी एक नवीन मालिका भेटीला आणली आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com