'तू ही रे माझा मितवा' (Tu He Re Maza Mitwa) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. मालिकेतील ईश्वरी आणि अर्णवसिंह राजेशिर्केच्या प्रेमकथेच चाहते गुंतले आहेत. याच्या नात्यात रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ईश्वरी आणि अर्णवमध्ये चांगली मैत्री होत असताना आता पुन्हा त्यांच्या नात्यात दुरावा येणार आहे. याची खास झलक पाहायला मिळाली आहे.
'तू ही रे माझा मितवा' मालिकेत सुरुवातीपासून ईश्वरी आणि अर्णव यांच्यात भांडणे पाहायला मिळाली होती. त्याच्या या खट्याळ भांडणांनी त्याच्यात मैत्रीचे नाते फुलले आहे. मात्र आता कुठे तरी या मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे. अर्णवला ईश्वरी हळूहळू आवडायला लागली आहे. मात्र याचा ईश्वरीला याबद्दल काहीच माहित नाही आहे. मालिकेत सध्या अर्णव ईश्वरीच्या आईचे आणि आत्याचे ईश्वरीचे राकेशशी लग्न लावून देणार असल्याचे बोलणे ऐकतो. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवच्या नात्यात दुरावा येणार आहे. अर्णवने देखील आता लग्नाचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ईश्वरी अर्णवला पेढा देते. तेव्हा अर्णव म्हणतो की, "मला 'ईश्वरी स्वीट्स'ला एक मोठी ऑर्डर द्यायची आहे. अर्णव राजेशिर्के लावण्याबरोबर लवकरच लग्न करत आहे." हे ऐकताच ईश्वरीच्या चेहऱ्याचा रंग उडतो. शेवटी अर्णव म्हणतो की," तू सुद्धा राकेशशी लग्न करत आहेस ना? अभिनंदन!" यानंतर ईश्वरीच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तर अर्णव त्याच्या हातातला पेढा कुस्करून टाकतो आणि पुढे जातो.
'तू ही रे माझा मितवा' मालिकेत ईश्वरी आणि अर्णवची प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपणार की काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत मराठी अभिनेत्री शर्वरी जोग ही ईश्वरी देसाईच्या भूमिकेत आणि अभिनेता अभिजीत आमकर हा अर्णवसिंह राजेशिर्केच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 10.30 वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.