मराठमोळी अभिनेत्री, नृत्यांगना सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) कायम आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांनना भुरळ पाडत असते. तिच्या डान्सचे तर चाहते दिवाने आहेत. तिने मराठीसह हिंदीतही आपल्या कामाने ओळख मिळवली आहे. नुकतीच सुखदाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुखदाच्या गुडघ्याला दुखापत झाली असूनही तिने परदेशात पार पडलेल्या युरोपियन मराठी संमेलनात आपली सुंदर नृत्यकला सादर केली आहे. याचे खास फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. सुखदाचा डान्स करताना गुडघा ट्विस्ट झाला. ज्यामुळे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या प्रकृतीचे अपडेट आणि तिने हा प्रवास कसा पार केला, जाणून घेऊयात.
सुखदा खांडकेकरचा नाचताना गुडघा ट्विस्ट झाला आणि तिच्या पायाला दुखापत झाली आहे. 29 एप्रिलला तिच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती आराम करत आहे. सुखदाचे लिगामेंट टेअरचे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशननंतर किमान ३ महिने आराम करायचा असतो, मात्र सुखदाने 2 महिन्यानंतरच युरोपियन मराठी संमेलनात नृत्याचा कार्यक्रम घेतला आहे. कार्यक्रमात भाग घेता यावे आणि वजन वाढू नये म्हणून सुखदाने फिजियोथेरेपी, डाएट केले. तसेच तिने मनापासून ठरवले होते की, मला लवकर बरं व्हायचे आहे.
सुखदाला या सर्वात तिच्या कुटुंबाने, मित्रमंडळींनी आणि डॉक्टरांनी मोठी साथ दिली. तसेच तिच्या कोरिओग्राफरने तिला जमतील अशा डान्सच्या स्टेप करून बसवून दिल्या. सुखदाने या सर्वांचे आभार मानले आहेत. तिने नृत्याचा कार्यक्रम छान केला. सुखदाने तिच्या या अनुभवातून प्रेक्षकांना हे सांगितले आहे की, आपण एखादी गोष्टी मनात आणली आणि त्यासाठीचे प्रयत्न केले तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
सुखदाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सुखदा खांडकेकरच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.