Best Movies In India: पाथेर पांचाली, मसान ते सैराट... भाषांची मर्यादा तोडून हिट झालेले १० चित्रपट!

top 10 best movies in india : पाहा सिनेसृष्टी गाजवलेल्या चित्रपटांची यादी. तसेच त्या सिनेमातला वास्तववाद जाणून घ्या.
Best Movies In India
Best Movies In Indiagoogle
Published On

भारत देश हा विविध बोली भाषेने सजलेला देश आहे. तरी बऱ्यापैकी लोक फक्त त्यांच्याच भाषेतले सिनेमे पाहतात. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. तर त्या भाषेतले सिनेमे सुद्धा आपल्या भाषेतल्या सिनेमांसारखे असतात. आपण आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी विविध भाषेतले सिनेमे आपण पाहिले पाहिजेत. यासाठी उत्तम यादी तुमच्यासाठी तयार केली आहे. या सिनेमांमध्ये प्रत्येकाची वेगळी भाषेची शैली आहे. त्याच सोबत या सिनेमांचे विषय अगदी आपल्या ज्ञानात भर टाकणारे आहेत. ही यादी पुढील प्रमाणे आहे.

पाथेर पांचाली (बंगाली )

'पाथेर पांचाली' हा चित्रपट हा सिनेसृष्टीतला एक टर्निंग पॉईंट ठरला. कारण हा सिनेमा समांतर चळवळीला सुरुवात करणारा होता. ज्यात सत्यता आणि सामाजिक वास्तववादाचे समर्थन केले आहे.

सुब्रमण्यपूरम (तमिळ चित्रपट)

'सुब्रमण्यपूरम' हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्षित झाला होता. विशेष म्हणजे हा सगळ्यात कमी बजेटचा चित्रपट होता. त्याचसोबत हा चित्रपट ८५ दिवसात तयार करण्यात आला आहे.

चारुलता

'चारुलता' हा चित्रपट जेष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा संपुर्ण चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

Best Movies In India
Gaurav More Home : फिल्टरपाड्याच्या 'बच्चन'ला हवंय म्हाडाचे घर, गौरव मोरेने केला पवाईच्या घरासाठी अर्ज!

मसान

२०१५ मध्ये 'मसान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी ड्रामा या पद्धतीचा आहे. याचा दिग्दर्शक नीरज घायवान आहे. यात मुख्य भुमिकेत विकी कौशल आहे.

गॅंग्स ऑफ वासेपूर

गॅंग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे. यात गुन्हेगारी अत्यंत जवळून आणि उघडपणे दाखवण्यात आली आहे.

कोर्ट

'कोर्ट' या चित्रपटाचे दिग्दर्शन चैतन्य ताम्हणे यांनी केले आहे. यात एका गायकाबद्दलची कथा आहे. त्याच सोबत एका कामगाराचा मृतदेह यात सापडतो त्याचा खटला कोर्टात चालू असतो. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

सैराट

महाराष्ट्राचे सगळ्यात चाहते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'सैराट' चित्रपट थेट वास्तवाला हात घालणारा आहे. त्यात प्रेम प्रकरणासह त्या परिसरातले विचार किंवा तिथला जाती वाद हा उत्तम रित्या अनुभवू शकता.

वरील चित्रपटात तुम्हाला हिंदी, तामिळ, बंगाली , पंजाबी आणि मराठी या भाषांमध्ये तयार केलेले सिनेमे पाहायला मिळणार आहेत.या सिनेमांमध्ये तुम्ही प्रत्येकाची कथा सांगण्याची शैली पाहू शकता. अभ्यासू शकता. त्यात तुम्ही कलात्मक दृष्टीकोन पाहू शकता. वास्तववाद फार जवळून अनुभवू शकता.

Edited by : Sakshi Jadhav

Best Movies In India
Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com