Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

Dame Maggie Smith Death News : प्रसिद्ध अभिनेत्रीम मॅगी स्मिथ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड
Popular Actress Death:Saam tv
Published On

Dame Maggie Smith Death : 'हॅरी पॉटर' सिनेमातील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. डेम यांच्या कुटु्ंबाने त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाची माहिती कळताच चाहत्यावर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांनी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आह. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. त्यांना १९७० साली सिनेमा 'द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी' आणि दुसरा पुरस्कार हा १९७९ साली 'कॅलिफोर्निया सुइट' या सिनेमासाठी मिळाला. त्यांना दोनदा ऑस्कर मिळाल्यानंतर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता.

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड
Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

डेम मॅगी स्मिथ यांच्या कुटुंबीयांनी लिहिली भावुक पोस्ट

डेम मॅगी स्मिथ यांचा मुलगा टोबी स्टीफेन्स आणि क्रिस लार्किन यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'आम्हाला माहिती सांगताना खूप दु:ख होत आहे की, डेम मॅगी स्मिथ यांचं निधन झालं आहे. त्यांनी आज सकाळी २७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे मित्र आणि कुटुंब हजर होतं. दोन मुले आणि एकूण पाच नात-नातूंना सोडून गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे'.

'नोवेयर टू गो' सिनेमापासून करिअरला सुरुवात

'दु:खद प्रसंगात चेल्सी आणि वेस्टमिंस्टर रुग्णालयाने व्यवस्थित सेवा दिल्याविषयी आभार व्यक्त करतो. रुग्णालयाने शेवटच्या काळात चांगली काळजी घेतली. आम्ही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आभार मानतो. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, असे त्यांनी पुढे सांगितले .

१९३४ साली ऑक्सफोर्डमध्ये जन्मलेल्या स्मिथ यांनी सुरुवातीला प्लेहाऊस थिएटरमध्ये काम केलं आहे. तर पुढे १९५८ साली 'नोवेयर टू गो' या सिनेमात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. स्मिथ यांनी मनोरंजनासहित सिनेमातून नवा विचार देखील दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com