विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरची जोडी चाहत्यांना भावली, ‘Family Star’ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई...

Family Star Box Office Collection: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या 'फॅमिली स्टार' चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Family Star Day 1 Box Office Collection
Family Star Day 1 Box Office CollectionInstagram

Family Star Day 1 Box Office Collection

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'फॅमिली स्टार' (Family Star) बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांटी प्रतीक्षा संपलेली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. (Tollywood)

Family Star Day 1 Box Office Collection
Mylek Trailer: सोनाली खरेच्या 'मायलेक'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा हा आकडा दिलासादायक आहे. ट्रेलर आणि टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फारच उत्सुकता होती. चित्रपटाच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, चित्रपटाने जगभरामध्येही उत्त कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूड मुव्ही रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने जगभरामध्ये ८ ते १० कोटींची कमाई केलेली आहे. (Films)

दरम्यान, 'फॅमिली स्टार'च्या ट्रेलर आणि म्युझिक ट्रॅकला यापूर्वीच प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित फॅमिली स्टारची कथा गोवर्धनच्या जीवनाभोवती फिरते. गोवर्धन हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे जो आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्यांचा अनपेक्षित रोमान्स हा चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरतो. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याची रन टाइम २ तास ४३ मिनिटे आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

Family Star Day 1 Box Office Collection
Jaya Bachchan: लग्न कुणासोबत करावं? अभिनेत्री जया बच्चन यांनी दिल्या खास टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com