Jaya Bachchan: लग्न कुणासोबत करावं? अभिनेत्री जया बच्चन यांनी दिल्या खास टिप्स

Jaya Bachchan Video: जया बच्चन सध्या त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये रिलेशनशीपविषयी बोलताना दिसल्या. बेस्ट फ्रेंडशी लग्न करावे की नाही नाही याबाबत त्यांनी आपल्या नातीला खास सल्ला दिला आहे.
What The Hell Navya Season 2
What The Hell Navya Season 2Saam Tv

What The Hell Navya 2:

बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. कोणत्याही विषयावर मग तो राजकीय असो, सामाजिक असो वा नातेसंबंधाशीसंबंधित त्यावर त्या आपले मत ठामपणे मांडतात. सध्या त्या त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये रिलेशनशीपविषयी बोलताना दिसल्या. बेस्ट फ्रेंडशी लग्न करावे की नाही नाही याबाबत त्यांनी आपल्या नातीला खास सल्ला दिला आहे.

नव्या नवेली नंदाचा पॉडकास्ट 'व्हाट द हेल नव्या' (What The Hell Navya 2) हा सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. या शोचा दुसरा सीझन संपत आला आहे. नव्याने नुकताच या शोचा शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये नव्या आपली आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत गप्पा मारताना दिसली. या शोमध्ये जया बच्चन यांनी नव्याला रिलेशनशीपचे सल्ले दिले. त्याचसोबत लग्न कुणासोबत करावे हे सांगितले.

नव्याने आजीला 'बेस्ट फ्रेंडशी लग्न करावे का?' असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना जया बच्चन यांनी तात्काळ हो उत्तर दिले. तर नव्या पुढे विचारते की, जर दोन व्यक्ती फक्त फ्रेंड्स असतील आणि ते फ्रेंडशीपमध्ये रोमांस आणत असतील तर ते योग्य आहे का? यावर उत्तर देताना जया बच्चन सांगतात की, हे योग्य आहे. माझा सर्वात चांगला मित्र माझ्या घरामध्ये आहे. माझा नवरा माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि मी त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही.'

What The Hell Navya Season 2
Kasara Movie: स्मिता तांबेच्या 'कासरा' चित्रपटातील 'घराला घरपण' गाणं प्रदर्शित

या शोमध्ये श्वेता नंदा म्हणाली की, 'मला कळत नाही की लोकं त्यांची मुलं त्यांची बेस्ट फ्रेंड आहेत असं का म्हणतात?' जया म्हणाली, 'पण तुझी मुलं तुझी फ्रेंड का होऊ शकत नाहीत?' श्वेता म्हणाली की, 'आपण फ्रेंड्स नाही. कारण तू माझी आई आहेस. आपल्यामध्ये एक सीमा आहे जी मी कधीही ओलांडणार नाही.' नव्या म्हणाली, 'तू आई आहेस आणि तू देखील एक आईच आहेस, त्यामुळे तुम्ही फ्रेंड्स होऊ शकता.' तर श्वेता म्हणाली, 'माझी मुलं माझी मुलंच आहेत आणि माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्सच आहेत.

What The Hell Navya Season 2
निर्मात्यांनी Rashmika Mandanna ला दिलं वाढदिवसाचं खासं गिफ्ट, 'Pushpa 2' मधला फर्स्ट लूक केला शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com