निर्मात्यांनी Rashmika Mandanna ला दिलं वाढदिवसाचं खासं गिफ्ट, 'Pushpa 2' मधला फर्स्ट लूक केला शेअर

Rashmika Mandanna First Look From Pushpa 2: 'पुष्पा २'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक शेअर करत रश्मिका मंदान्नाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मिकाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Rashmika Mandanna First Look From Pushpa 2
Rashmika Mandanna First Look From Pushpa 2Saam Tv

Pushpa 2: The Rule Movie:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आज आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रश्मिका मंदान्ना लवकरच 'पुष्पाः द रूल' (Pushpa 2: The Rule Movie) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक शेअर करत रश्मिका मंदान्नाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मिकाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रश्मिकाचा या चित्रपटातील फर्स्ट लूकमधील अंदाज आणि स्टाइल पाहून ती यावेळी सर्वात जास्त आकर्षक दिसत आहे. रश्मिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पुष्पा २ मधील रश्मिकाचा जो फर्स्ट लूक समोर आला आहे त्यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर तिने हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. रश्मिका या लूकमध्ये खूपच जास्त सुंदर दिसत आहे. फर्स्ट लूकमध्ये ती डोळ्याच्या माध्यमातून निशाणा साधत असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2'मधून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. तो देखील अशाच अंदाजात दिसला होता. श्रीवल्ली आणि पुष्पाचा हा लूक पाहता गाण्याच्या सीक्वेन्समध्ये ही स्टाईल करण्यात आल्याचे दिसत आहे. रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक शेअर करत निर्मात्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मिकाचा फर्स्ट लूक शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,'𝒏𝒂𝒕𝒊𝒐𝒏'𝒔 𝒉𝒆𝒂𝒓𝒕𝒕𝒉𝒓𝒐𝒃 श्रीवल्ली उर्फ ​​रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

निर्मात्यांनी आपल्या अधिकृत X आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरवर पुष्पा नावाने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'पुष्पा 2 द रुलचा टीझर 8 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 'पुष्पा २' चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. आणखी एक पोस्ट शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, 'आमची श्रीवल्ली म्हणते की, पुष्पा २ च्या टीझरसाठी अजून ३ दिवस बाकी आहेत. ८ एप्रिलला तुमच्याही अंगावर काट येईल.'

Rashmika Mandanna First Look From Pushpa 2
Kasara Movie: स्मिता तांबेच्या 'कासरा' चित्रपटातील 'घराला घरपण' गाणं प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com