Family Star Day 2 Collection: 'फॅमिली स्टार'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, दुसऱ्या दिवशी दिलासादायक प्रतिसाद

Family Star Box Ofiice Collection: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या 'फॅमिली स्टार' चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
Family Star Box 2nd Day Ofiice Collection
Family Star Box 2nd Day Ofiice CollectionSaam Tv

Family Star Box 2nd Day Ofiice Collection

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा बहुप्रतीक्षित 'फॅमिली स्टार' (Family Star) चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरने पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. (Tollywood)

Family Star Box 2nd Day Ofiice Collection
Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा एकदम जबरा लूक; ‘पुष्पा २’चे नवीन पोस्टर लॉन्च, कधी रिलीज होणार टीझर?

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा हा आकडा दिलासादायक आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने देशभरामध्ये एकूण २ दिवसातच १० कोटींची कमाई केलेली आहे. अद्याप जगभरातला कमाईचा आकडा स्पष्ट झालेला नाही. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विजय आणि मृणाल व्यतिरिक्त ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता अजय घोष आणि दिव्यांशा घोष अशी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे. (Films)

Family Star Box 2nd Day Ofiice Collection
Constable Manju: ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये तात्यासाहेबांचा दरारा; मराठमोळा अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका

दरम्यान, 'फॅमिली स्टार'च्या ट्रेलर आणि म्युझिक ट्रॅकला यापूर्वीच प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित फॅमिली स्टारची कथा गोवर्धनच्या जीवनाभोवती फिरते. गोवर्धन हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे जो आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्यांचा अनपेक्षित रोमान्स हा चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरतो. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याची रन टाइम २ तास ४३ मिनिटे आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

Family Star Box 2nd Day Ofiice Collection
TRP Rating Of Marathi Serial: टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ची बाजी, कोणत्या मालिकांचा आहे टॉप १० यादीत समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com