Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा एकदम जबरा लूक; ‘पुष्पा २’चे नवीन पोस्टर लॉन्च, कधी रिलीज होणार टीझर?

Pushpa 2 Teaser Update : पुष्पा २ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा दमदार लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा २ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला जाणार आहे.
Pushpa 2 Teaser Update
Pushpa 2 Teaser Update

Pushpa 2 Allu Arjun New Look Teaser Date :

पुष्पा २ चित्रपटाचा नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. प्रेक्षक आतुरतेने अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा -२' चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५ एप्रिल रोजी रश्मिका मंदानाच्या लूकची झलक दाखवली होती. आता या चित्रपटातील मुख्य कलाकार अल्लू अर्जुनने नवीन पोस्टर रिलीज केले आहे. यात त्याचा नवीन लूक दाखवण्यात आलाय. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीय. हे पोस्टर प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनने सिनेमाचा टीझर कधी पाहता येईल याची तारीख सांगितलीय. (Latest News)

या चित्रपटाचा टीझर ८ एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे नवे नवीन पोस्टर रिलीज करण्यात येत आहे. यात अल्लू अर्जुनचे लूक दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हाता पायाचे लूक दाखवण्यात आलेत. अल्लू अर्जुनचा एक अजब गजब लूकचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या अल्लू अर्जून साडीमध्ये दिसत होता. त्याच्या गालाला लाल आणि निळा रंग लावला होता. त्याच्या गळ्यात लिंबूच्या माळा दिसत होत्या.

यानंतर दुसऱ्या पोस्टरमध्ये घुंगरू बांधलेल्या पायाचे चित्र समोर आले होते. तिसऱ्या पोस्टरमध्ये हातात अंगठी घातली आहे आणि आता आलेल्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या पात्राचा चेहरा दिसत आहे, ज्याने हातात त्रिशूळ धरले आहे आणि तो शंख फुंकत आहे. लाल रंगही उडताना दिसत आहे.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते त्या पोस्टवर कमेंट करत आहेत. दरम्यान अल्लू अर्जुनचा नवा लूक पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढू लागलीय. एक चाहता म्हणाला की, आता वाट पाहणं अशक्य आहे. तर एकाने लिहिलं की, शानदार पोस्टर, दरम्यान या चित्रपटाचा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी प्रदर्शित केले जाणार आहे.

रश्मिका मंदान्नाचा वाढदिवसही ५ एप्रिलला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिच्या वाढदिवसालाच तिचा लूक प्रेक्षकांना दाखवला. चित्रपटातील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना हिचा लूक खूपच सुपर आहे. “श्रीवल्ली उर्फ ​​रश्मिका मंदान्ना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुष्पा: रुलचा टीझर ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करताना म्हटलं आहे.

Pushpa 2 Teaser Update
निर्मात्यांनी Rashmika Mandanna ला दिलं वाढदिवसाचं खासं गिफ्ट, 'Pushpa 2' मधला फर्स्ट लूक केला शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com