Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; आरोपींना मुंबईत कुणी केली मदत? क्राईम ब्राँचचा कोर्टात खळबळजनक दावा

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सुमित, कुणाल, राधा आणि बबिता या चार आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. क्राइम ब्रँच आणि बचाव पक्षाने काय युक्तिवाद केला जाणून घ्या.
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CaseSaam Tv
Published On: 

Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुमित, कुणाल, राधा आणि बबिता या चारही जणांना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू असून, गोळीबारामागील पूर्वनियोजित कट, शस्त्रांचा पुरवठा आणि आरोपींमधील संपर्क यांचा तपास केला जात आहे. न्यायालयात यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले.

क्राइम ब्रँचचा न्यायालयात काय युक्तिवाद?

क्राइम ब्रँचने न्यायालयात आरोपी हे पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा केला. आरोपी क्रमांक १, २ आणि ३ यांना अटक करण्यात आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली. या प्रकरणात शस्त्रे कुठे नष्ट करण्यात आली किंवा त्यांची विल्हेवाट कुठे लावण्यात आली, याबाबत तपासातून माहिती मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपी राधाने गोळीबार करणाऱ्या आरोपीला शस्त्रे पुरवल्याचा आरोप क्राइम ब्रँचकडून करण्यात आला आहे.

Tiger Shroff Firing Case
Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा मॉडर्न आणि क्लासी अंदाज; ब्लू शर्ट-स्कर्ट कॉम्बिनेशनने वेधलं लक्ष

तसेच आरोपींनी अनेक फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल डेटा डिलीट केल्याचे तपासात आढळल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. आरोपींकडून काही व्हॉइस नोट्स हस्तगत करण्यात आल्या असून, त्यावरून आरोपींना कटाची माहिती असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाला सांगितले. या डिजिटल पुराव्यांचा आणि आरोपींमधील संपर्काचा तपास सुरू आहे. असा युक्तीवाद करण्यात आला.

Tiger Shroff Firing Case
Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

बचाव पक्षाचा युक्तिवाद काय?

दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपींचे मोबाईल फोन, सिम कार्ड आणि वाहने पोलिसांनी आधीच जप्त केली आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज, दोन पिस्तुले, काही जिवंत काडतुसे, सिग्नल ॲपमधील डेटा, व्हॉइस सॅम्पल्स आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले. ट्रान्झिट रिमांडसह गेल्या सात दिवसांत तपास यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवून नवीन पुरावे मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बचाव पक्षाचे म्हणणे होते. याशिवाय, आरोपींपैकी नेमका कोणाचा अनिल पंडित यांच्याशी थेट संबंध होता, हे तपास यंत्रणेला अद्याप सिद्ध करता आलेले नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.

आतापर्यंत गोळा केलेले पुरावे आणि पूर्ण झालेली चौकशी लक्षात घेता, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने चारही आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तपासात या प्रकरणातील कट आणि शस्त्रांच्या पुरवठ्याबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com