Tiger Shroff : "तिथे रक्ताचे डाग दिसले..."; टायगर श्रॉफवर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला थरार

Tiger Shroff Firing - Eyewitness : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यावेळी अनेक कलाकार मैदानावर उपस्थित होते. टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्याने घटनास्थळी नेमकं काय घडलं, याचा खुलासा केलाय.
Tiger Shroff Firing - Eyewitness
Tiger Shroffsaam tv
Published On: 
Summary

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

गोळीबाराआधी टायगर मैदानात फुटबॉल खेळत होता

टायगर श्रॉफसोबत मैदानात होते बॉलिवूडचे अनेक कलाकार

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात हल्लेखोरांनी गोळीबार केला, मात्र सुदैवाने अभिनेता सुरक्षित बचावला. फुटबॉल सामन्यानंतर टायगर पुष्पा पार्कमधून बाहेर पडत असताना, त्याला पाहण्यासाठी त्याच्या गाडीभोवती चाहत्यांची गर्दी जमली होती. त्याच वेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन व्यक्तींनी गोळीबार केला.

'स्क्रीन' (SCREEN) च्या वृत्तानुसार, टायगर काही चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींसोबत फुटबॉल खेळत होता. १८ खेळाडूंच्या या सामन्यात अपारशक्ती खुराना, अभिमन्यू दसानी, सीझर गोन्साल्विस, अभिषेक बजाज आणि करण वीर मेहरा यांचा समावेश होता. गोळीबार झाला तेव्हा हे सर्वजण मैदानावरच उपस्थित होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या करण वीर मेहराने गोळीबारानंतर निर्माण झालेल्या गोंधळाचे वर्णन केले. एनडीटीव्ही (NDTV) शी बोलताना तो म्हणाला, "माझी गाडी अगदी मागे होती. आम्ही गेटमधून बाहेर पडून तिथे पोहोचलो, तेव्हा मला रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर समजले की टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली आहे. टायगर सुरक्षित आहे, याचा आनंद आहे. पण ड्रायव्हरबद्दल वाईट वाटत आहे, तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करतो... तिथे काही मुले वाढदिवसाची पार्टी साजरी करत होती; गोळीबार होताच सर्वजण इकडे-तिकडे सैरावैरा धावू लागले."

अभिनेता पुढे म्हणाला की, "माझी गाडी थोडी मागे होती आणि तिथे अनेक लोक फोटो काढत होते. आम्हाला अचानक गोळ्यांचा आवाज ऐकू आला. काही लोक ओरडत होते की कोणीतरी गोळीबार केला आहे. सुरुवातीला आम्हाला वाटले की कदाचित फटाके फोडल्यामुळे असा आवाज आला असावा, कारण तिथे काही लोक फटाके फोडून आनंद साजरा करत होते. बाहेर उभे असलेल्या चाहत्यांनी अचानक आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर खरोखरच गोळीबाराचे आवाज आले, ज्यामुळे फटाके फोडणे थांबले. हे पाहून सुरक्षा रक्षक सतर्क झाले आणि आम्ही पोलिसांना फोन केला. तोपर्यंत टायगर त्याच्या ड्रायव्हरसोबत तिथून निघून गेला होता..."

Tiger Shroff Firing - Eyewitness
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; धमकी देणारा नेमकं काय म्हणाला?

"मी टायगरला खूप काळापासून ओळखतो. तो अतिशय चांगल्या माणसांपैकी एक आहे. तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागतो. त्याच्यासोबत असे घडताना पाहून खूप दुःख होत आहे. मी त्याच्या कुटुंबालाही खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. टायगर आणि त्याच्या कुटुंबाला या परिस्थितीतून जाताना पाहणे माझ्यासाठीही अत्यंत वेदनादायी आहे." या धक्कादायक घटनेने बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com