Tiger Shroff : टायगर श्रॉफची प्रकृती चिंताजनक? व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना धक्का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा नर्सिंग पार्कजवळ रविवारी सायंकाळी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.

Shooting at Tiger Shroff’s Car | instagram

फुटबॉल खेळून परतताना हल्ला

प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफ मैदानात फुटबॉल खेळल्यानंतर कारने बाहेर पडत असताना हा प्रकार घडला.

Attack While Returning from a Football Game | instagram

दुचाकीवरून तीन हल्लेखोर

मिळालेल्या माहितीनुसार, तीन जण दुचाकीवरून आले होते. त्यापैकी दोघांनी टायगरच्या गाडीवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी कारच्या दिशेने जवळपास सहा ते सात गोळ्या झाडल्याचे वृत्त समोर आले आहे.

Three Assailants on a Two-Wheeler | instagram

हल्लेखोर घटनास्थळावरून फरार

गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून पळून गेल्याची माहिती आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Assailants Flee the Scene | instagram

बिश्नोई टोळीच्या नावाची चर्चा

या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी आणि घटनेशी असलेला संबंध पडताळणे आवश्यक आहे.

Mention of the Bishnoi Gang | instagram

टायगरच्या प्रकृती कशी

गोळीबारानंतर टायगर श्रॉफचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याच्या हाताला आणि छातीला पट्ट्या दिसत आहेत. फोटोमध्ये अभिनेता टायगर श्रॉफची प्रकृती चिंताजनक दिसत आहे.

Tiger Shroff’s Condition

फोटोमध्ये नेमकं काय?

फोटोमध्ये टायगर सोफ्यावर बसलेला असून उजव्या हातावर आणि छातीवर प्लास्टर लावलेलं आहे, तर डाव्या हाताला पट्ट्यांनी बांधलं आहे. त्याचे केस विखुरलेले असून चेहऱ्यावर थकवा, वेदना जाणवत आहे.

Photograph

टायगरला धक्का

घडलेल्या घटनेमुळे टायगर श्रॉफला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला आहे. याआधी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांवर असे हल्ले करण्यात आले आहे.

Shock to Tiger

NEXT :  एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Gautami Patil | SAAM TV
येथे क्लिक करा...