Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Shreya Maskar

गौतमी पाटील

नृत्यांगना गौतमी पाटील कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने सुंदर साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे पाहून चाहत्यांची विकेट पडली आहे.

Gautami Patil | instagram

सुंदर साडी

गौतमीने निळ्या रंगाची सोनेरी नक्षीकाम असलेली साडी, त्यावर सिल्व्हर रंगाचा एलिगंट ब्लाऊज परिधान केला आहे.

Beautiful saree | instagram

पारंपरिक लूकला मॉडर्न टच

नथीचा रुबाब, गुलाबाचा साज अन् कातिल नजर गौतमीचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

modern touch to a traditional look | instagram

गौतमीचा साज श्रृंगार

गळ्यातील नाजूक सोन्याचा हार, कपाळावरील छोटीशी टिकली आणि केसांमध्ये माळलेला लाल गुलाब तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

Gautami's makeup | instagram

निखळ हास्य

तिचे लांबसडक, मोकळे काळेभोर केस आणि चेहऱ्यावरील गोड हास्य या लूकला अधिकच मोहक बनवत आहे.

Pure laughter | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

गौतमीच्या फोटोंवर "अप्सरा", "रुपसुंदरी"," क्यूट", "पाटलीन बाई", "आय लव्ह यू गौतमी", "सबसे कातिल गौतम पाटील", "तुझी कातिल नजर...", "सुंदर रुप तुझे" अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोंवर येत आहे.

Comments from fans | instagram

नवीन गाणे

गौतमी पाटीलचे नुकतेच 'काठी ना घोंगडं...' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत नाही. या गाण्यात गौतमीचा मराठमोळा, पारंपरिक लूक पाहायला मिळक आहे.

new song | instagram

मनोरंजन विश्व

गौतमी पाटीलचे नाव मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर आहे.गौतमी पाटीलने नृत्यांगनासोबतच एक अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आजवर ती अनेक टिव्हीच्या कार्यक्रमात दिसली आहे. चाहते आता तिच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

Entertainment Universe | instagram

NEXT : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

Gautami Patil | SAAM TV
येथे क्लिक करा...