

Thalapathy Vijay: दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणातही मोठं स्थान मिळवणारे थलपती विजय सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. आज १० वी चा निकाल लागल्यानंतर सोशल मिडियावर विजय यांची १०वीच्या बोर्ड परीक्षेची मार्कशीट व्हायरल झाली असून त्यातून त्यांच्या शालेय जीवनाची झलक समोर आली आहे.
या व्हायरल मार्कशीटनुसार, विजय यांनी १०वीत एकूण ११०० पैकी सुमारे ७११ गुण मिळवले होते, म्हणजेच त्यांचे एकूण टक्केवारी सुमारे ६५% होती. विशेष म्हणजे, गणित हा त्यांचा सर्वात कमकुवत विषय ठरला. गणितात त्यांना फक्त २०० पैकी ९५ गुण मिळाले, म्हणजेच जवळपास ४७% गुण.
तर दुसरीकडे, तमिळ आणि इतर विषयांमध्ये त्यांनी चांगले गुण मिळाले होते. विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये त्यांचे गुण समाधानकारक होते. यामुळे ते एक सरासरी विद्यार्थी असल्याचे दिसून येते.
१० वीच्या बोर्ड परीक्षेत विजय यांना प्रत्येक विषयात किती गुण मिळाले?
तमिळ: १५५/२००
इंग्रजी: १३३/२००
विज्ञान: २०६/३००
समाजशास्त्र: १२२/२००
गणित: ९५/२००
सध्या ही मार्कशीट व्हायरल होण्यामागेही एक खास कारण आहे. अलीकडेच विजय यांनी राजकारणात मोठी झेप घेतली असून त्यांच्या पक्षाने निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
विजय यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. एक साधारण विद्यार्थी असलेले विजय पुढे जाऊन दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक बनले आणि आता राजकारणातही प्रभावी नेतृत्व करत आहेत. त्यांच्या आयुष्याची ही कहाणी एक महत्त्वाचा संदेश देते ते म्हणजे फक्त मार्कशीटवरून व्यक्तीचं भविष्य ठरत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.