Why did Raghu-Rama Leave Roadies: रघु - रामने स्पष्ट केले ‘रोडिज’ सोडण्याचे कारण; शो बद्दल केली मोठी पोलखोल

Raghu-Rama Leave Roadies: २००९ मध्ये प्रसिद्ध टीव्ही निर्माता रघु राम यांच्या ‘रोडिज’ सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.
Why did Raghu-Rama leave Roadies
Why did Raghu-Rama leave RoadiesSaam Tv
Published On: 

Raghu Ram On Quitting Roadies: रघुराम भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव. २००३ मध्ये आपला भाऊ राजीव लक्ष्मण आणि आर जे अमित सोबत ‘रोडिज’ या कार्यक्रमाची सुरूवात केली. स्पर्धकांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीची चाचणी करणारा शो म्हणून त्याची ओळख. ‘रोडिज’ हा शो नेहमीच प्रचंड चर्चेत राहतो.

नॅशनल टीव्हीवरील त्याच्या वागण्या- बोलण्यामुळे त्याच्यामुळे अनेकदा त्यावर टीका झाली. पण नंतर त्यांचं वागणं सर्वांनाच आवडू लागले. त्यांच्या या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे आज पर्यंत टेलिव्हिजन सृष्टीत ‘रोडिज’चे १९ सीझन सुरू आहे. रणविजय सिंगपासून ते आयुष्मान खुरानापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. पण २००९ मध्ये शोचे निर्माते रघु राम यांनी ‘रोडिज’ सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Why did Raghu-Rama leave Roadies
Chrisann Pereira Arrested In UAE: 'सडक २' फेम अभिनेत्री अडचणीत; अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात क्रिशन परेराला दुबईत अटक

२००९ मध्ये प्रसिद्ध टीव्ही निर्माता रघु राम यांच्या ‘रोडिज’ सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. जेव्हा प्रेक्षकांना रघु राम ‘रोडिज’ हा लोकप्रिय शो सोडत आहे, ही माहिती समजली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रेक्षकांना रघु रामला नेहमीच ‘रोडिज’मध्ये पाहण्याची खूपच सवय झाली होती. शो ला राम राम ठोकल्यानंतर रघुरामने मुलाखतीत शो सोडण्याचे स्पष्ट कारण सांगितले नाही. २०१३ मध्ये रघु रामचे एक आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आणि त्यामध्ये ‘रोडिज’ सोडण्याचे कारण उलगडले. (Latest Marathi News)

रघू रामने आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट केले की, आशिष नावाच्या एमटीव्ही चॅनलचे कार्यकारीसोबत त्याचे मतभेद झाले. त्या कार्यकारींनी रघु रामला ‘रोडिज’ सोडण्याचा सल्ला दिला होता. जरीही चॅनलवर कोणताही परिणाम झाला तरी, चालेल पण त्याला कार्यक्रम सोडण्याचा सल्ला दिला. जेव्हा आशिषने रघु रामला त्यांच्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले तेव्हा प्रकरण आणखी वाढले, ज्याचे रघू रामने ‘बंधू कामगार’ करार म्हणून वर्णन केले.(Bollywood News)

Why did Raghu-Rama leave Roadies
Ranveer Singh-Sanjay Leela Bhansali Movie: पद्मावत नंतर रणवीर - संजय लीला भन्साली येणार एकत्र; या सिनेमात रंगणार ही जोडी

रघु राम पुढे म्हणतो, “मी त्यांना सांगितले की मला रोडीजमध्ये दिसण्यासाठी कधीही पगार मिळाला नाही. म्हणून मी तो शो सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही या शोची शूटिंग वीकेंडला करायचो, कारण त्यावेळी चॅनल बंद असायचं. त्यामुळे मी माझ्या कामात वेळ घेत नव्हतो. मला त्यात काही अडचण येत नव्हती. सोबतच मला कोणाशीही काम न करण्याचाही सल्ला दिला.”

रघु रामने सांगितले की २००९ मध्ये त्याला एक नवीन करार मिळाला होता, त्यानुसार तो कुठेही काम करू शकत नव्हता, त्यासोबतच तो एमटीव्ही देखील तो सोडू शकत नव्हता. यावेळी रघु राम म्हणाला, “कंत्राट म्हणजे एक प्रकारची बंधपत्रे होती.” त्याचवेळी त्याने शो सोडल्यामुळे त्याच्यावर न्यायालयात एक खटला देखील सुरू झाला. त्या समस्यांना रघु रामने तोंड दिले.(Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.