Ranveer Singh-Sanjay Leela Bhansali Movie: पद्मावत नंतर रणवीर - संजय लीला भन्साली येणार एकत्र; या सिनेमात रंगणार ही जोडी

Yashraj Films Ditch Ranveer Singh:
Ranveer Singh
Ranveer Singh Saam Tv

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अभिनयासह त्याच्या मनमोकळ्या आणि बिनधास्त स्वभावाने साऱ्यांची मने जिंकली आहेत. त्याचे विचित्र आऊटफिट आणि दीपिका आणि त्याचे नाते नेहमीच चर्चेत असते. रणवीरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने फ्लॉप होत आहेत.

2021 मध्ये रणवीरचा 83 रिलीज झाला होता.2022 मध्ये जयेशभाई जोरदार आणि सर्कस प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले होते. हे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर यशराज फिल्म्सने काही काळ रणवीरला साईन करण्यास नकार दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राच्या अगदी जवळच्या व्यक्तीने माहिती दिली आहे की रणवीर सिंग संजय लीला भन्साळीच्या आगामी 'बैजू बावरा' या सिनेमात दिसणार आहे. रणवीर सिंगने याआधी संजयसोबत 'पद्मावत'सह अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे.

Ranveer Singh
Palak-Pooja At Baba Siddique Iftar Party: बाबा सिद्दकीच्या इफ्तार पार्टीला गेल्या अन् पूजा हेगडे, पलक तिवारी ट्रोल झाल्या. हे आहे कारण

रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांची जोडी अनेकदा एकत्र आली आहे. ही अप्रतिम जोडी जितक्या वेळा एकत्र आली तितक्या वेळा त्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता 'बैजू बावरा'मध्ये ही जोडी एकत्र कोणता ड्रम करणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांचे सर्व चाहते या बातमीने खूप या आनंदी झाले आहेत.

तसेच आदित्य चोप्राच्या जवळच्या मित्रानेही सांगितले की, 'कोण म्हणतो की यशराज बॅनरला रणवीर सिंगसोबत काम करायचे नाही. आदित्य चोप्रा अजूनही रणवीरवर खूप प्रेम करतो आणि रणवीर सिंग लवकरच संजय लीला भन्साळीच्या बैजू बावरा या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असेल.

सूत्राने सांगितले की, काही लोक असेही म्हणतात की आदित्यने रणवीरला 'बैजू बावरा'मधून काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण हे अजिबात खरं नाही. भन्साळी या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत काम करणार आहेत.

रणवीर आणि आलिया करण जोहरच्या राजा और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घ काळानंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात जया बच्चन आणि शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com