Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास, सिनेसृष्टीवर शोककळा

Sanchita Ugale Suicide : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'कुमकुम भाग्य' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी आत्महत्या केली.
Sanchita Ugale Suicide
Actress Death SAAM TV
Published On
Summary

टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

अभिनेत्रीने राहत्या घरात घेतला गळफास

वयाच्या 30 व्या वर्षी आयुष्य संपवले

मनोज तांबे, नालासोपारा

TV Actress Sanchita Ugale Suicide Update News : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेने (Sanchita Ugale) राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्रीने वयाच्या ३० व्या वर्षी आयुष्य संपवले.अभिनेत्रीने मुंबईत नालासोपारा पूर्व आचोळे येथे राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने टिव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने घरात एकटी असताना दार लावून गळफास घेतला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहत होती.

मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे आयुष्य संपवल्यामुळे तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संचिता उगले सोशल मीडियावरही खपू सक्रिय होती. संचिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये एक सुंदर रील दिसत आहे.

संचिता उगलेची अभिनयन क्षेत्रातील कारकिर्द

संचिता उगलेने अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', विकी कौशलच्या 'छावा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री झळकली आहे. 'छावा' चित्रपटात अभिनेत्रीने ताराबाईची भूमिका साकारली होती. संचिताला हिंदी टिव्ही मालिका 'कुमकुम भाग्य'मुळे खूप लोकप्रियता मिळाली. 'वागळे की दुनिया' या मालिकेतही संचिता दिसली.

Sanchita Ugale Suicide
Lock Upp 2 : रितेश देशमुखच्या नव्या शोमध्ये कोण-कोण दिसणार? प्रणित मोरे, शिल्पा शिंदेसह 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com