Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानच्या फोटोतील बस स्टॉप आठवतोय का? 'होणार सून मी या घरची' मालिकेशी आहे खास कनेक्शन

Tejashri Pradhan New Post: तेजश्री प्रधान लवकरच झी मराठीवर कमबॅक करणार आहे. या नवीन मालिकेसाठी तेजश्रीने खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने बस स्टॉपवरुन फोटो शेअर केला आहे.
Tejashri Pradhan
Tejashri PradhanSaam Tv
Published On

तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. तेजश्री लवकरच झी मराठीच्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त तेजश्री प्रधानने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तेजश्री एका बस स्टॉपवर बसलेली दिसत आहे.

Tejashri Pradhan
New Serial: आई आणि बाबा रिटायर होत आहेत! नवी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, कधी? वाचा

बसस्टॉपचं जुन्या मालिकेशी खास कनेक्शन (Tejashri Pradhan new Post)

तेजश्री प्रधानने जो फोटो पोस्ट केला आहे त्यात ती एक बस स्टॉपवर बसलेली दिसत आहे. यावर तिने ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्या साठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली.. सज्ज झाल्ये पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची “जागा” निर्माण करायला, एक नविन पात्र, नव्या उमेदीने जगायला.लवकरचं भेटूया “ स्वानंदी सरपोतदार“ ला, असं कॅप्शनदेखील दिलं आहे.

होणार सून मी या घरची मालिकेशी खास कनेक्शन (Honar Sun Mi Ya Gharchi)

यावरुन हा बस स्टॉप तेजश्रीसाठी खूप खास असल्याचे समजत आहे. तिने याआधीही या बस स्टॉपवर शुटिंग केल्याचे समजत आहे. तेजश्री प्रधानच्या होणार सून मी या घरची मालिकेचा आणि बस स्टॉपचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. होणार सून मी या घरची मालिकेतदेखील श्री आणि जान्हवीची लव्हस्टोरी बस स्टॉपवरचं खुलली होती. तोच हा बसस्टॉप असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे ज्या जागेवर तेजश्रीने याआधी शूट केलं. त्याच जागेवरुन ती नवीन मालिकेची सुरुवात करणार आहे.

तेजश्रीची भूमिका

तेजश्री प्रधान लवकरच झी मराठीवर कमबॅक करणार आहे. पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत ती दिसणार आहे. या मालिकेत ती स्वानंदी सरपोतदार हे पात्र साकारणार आहे.

Tejashri Pradhan
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची नवीन मालिका कोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com