बिग बॉस १९ मध्ये तान्या मित्तल भावुक झाली
मित्र प्रणित मोरे आणि कुनिका सदानंद यांनी तिला नॉमिनेट केले.
कुनिकाने तिच्या संगोपनावर टिप्पणी केली .
तान्याने तिच्या भूतकाळातील वडिलांचा अत्याचार, जबरदस्तीचे लग्न आणि संघर्ष सांगितला.
Tanya Mittal: 'बिग बॉस १९' या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी स्पर्धक म्हणजे तान्या मित्तल. सोशल मीडियावरील कंटेन्ट क्रिएटर आणि मॉडेल तान्या नॉमिनेशन टास्कनंतर रडताना दिसली. कारण तिला तिच्याच लोकांकडून विश्वासघात झाला. आधी तिचा मित्र प्रणित मोरेने तिला नॉमिनेट केले आणि आता कुनिका सदानंद. पण या टास्क दरम्यान कुनिकाने तिच्याशी खूप गैरवर्तन केले, यामुळे तिचे अश्रू अनावर झाले. जेव्हा कुनिकाने तिच्या संगोपनाबद्दल भाष्य केले तेव्हा ती खूप रडली.
कुनिका सदानंदने गेल्या भागात तान्या मित्तलला सांगितले की तिच्या आईने तिला काहीही शिकवले नाही. तान्याला याचा खूप राग आला. त्यानंतर नॉमिनेशनमध्येही अभिनेत्रीने वेगळ्या पद्धतीने हेच सांगितले की तिला चांगले संगोपन मिळाले नाही. म्हणून ती रडत राहिली. जेव्हा घरातील लोकांनी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तान्याने तिच्या संघर्षाबद्दल सांगितले.
तान्या मित्तलला तिच्या वडिलांनी मारहाण केली
तान्या मित्तलने तिच्या वडिलांबद्दल सत्य सांगितले, 'माझे वडील मला मारायचे आणि माझी आई मला वाचवायची. "मी खूप कष्टाने व्यवसाय सुरू केला आहे, मला साडी नेसण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागयची. मी १९ वर्षांची असताना लग्न लावणार होते, त्यावेळी मला मरायचे होते.' तिने पुढे सांगितले की, वाईट काळात तिच्या आईने तिला साथ दिली. आणि तिला धाडस दिले. तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिला प्रेरित केले.
तान्या मित्तलने पदवी पूर्ण केलेली नाही
तान्या मित्तलच्या या खुलाशाने कुटुंबातील अनेक सदस्य भावुक झाले आणि त्यांचे कुनिकाविरुद्ध मत बदलले आहे. अमल मलिक आणि गौरव खन्ना यांनी अभिनेत्रीवर जोरदार टिका केली. तान्याचे वडील तिला इंजिनियर बनवू इच्छित होते. पण ती दोन वर्षांत तिचे कॉलेज सोडून घरी आली, त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला स्वयंपाक शिकण्यासाठी ६ महिने दिले आणि त्यानंतर तिचे लग्न होईल असे सांगितले. पण तिने त्या काळात काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.