Bigg Boss Marathi : 'तांबडी चामडी'वर सदस्य बेभान होऊन थिरकले, निक्कीचा डान्स पाहाच

DJ KRATEX Entry In Bigg Boss House : बिग बॉसच्या घरात DJ KRATEX एन्ट्री झाली असून घरातील सदस्य जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
DJ KRATEX Entry In Bigg Boss House
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) आता काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. शेवटचे दिवस घरात खूप सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळींना घरात येऊन सदस्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्यासोबत गेम देखील खेळले. हा सीझन सर्वत्र खूप गाजत आहे. 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर पार पडणार आहे.

'बिग बॉस मराठी' चा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सर्व सदस्य तुफान नाचताना पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात आज DJ KRATEX एन्ट्री करणार आहे. त्यांच्या तांबडी चामडी गाण्यावर घरातील सदस्यांना ताल धरलेला पाहायला मिळत आहे.

तांबडी चामडी या गाजलेल्या गाण्याचा संगीतकार KRATEX बिग बॉसच्या घरात आला आहे. तो स्वतः सुद्धा घरातील सदस्यांसोबत 'तांबडी चामडी' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. घरातील सर्व सदस्य मस्त एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे ग्रँड फिनाले आधी बिग बॉस सदस्यांचा मूड फ्रेश करत आहे तर दुसरीकडे बिग बॉसने मिड वीक एविक्शनची घोषणा केली आहे. ज्यामुळे सदस्यांचा आनंदाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आता बिग बॉसच्या घरात अभिजीत, जान्हवी, अंकिता, वर्षा ताई, धनंजय दादा, सूरज आणि निक्की हे 7 सदस्य उरले आहेत. त्यातील निक्कीला सोडून सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यांपैकी मिड वीक एविक्शनला कोणाचे नाव जाहीर होणार आणि कोण बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

DJ KRATEX Entry In Bigg Boss House
Amitabh Bachchan : ऐश्वर्याचा अपघात, अंबानींकडून मोठी मदत, अमिताभ बच्चन 2 दिवस झोपले नव्हते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com