

Happy Birthday Pravin Tarde: वैश्विक कोरोना महामारीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत क्वचित काही चित्रपटांना सुगीचे दिवस पाहायला मिळाले. प्रेक्षकांकडून मराठी चित्रपटांना उत्तम कामगिरीमुळे दिग्दर्शकांच्या पाठीवर थाप मिळाली.
आपल्या उत्तमोत्तम कलाकृतींनी प्रेक्षकांचे मनोरंजन करु पाहणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे या वर्षात बरेच प्रकाशझोतात आले. प्रेक्षकांना सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सलग या दोन चित्रपटांनी २०२२ मध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
आतापर्यंत प्रविणने प्रेक्षकांना मुळशी पॅटर्न, देऊळबंद, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सारखे हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले. प्रविण बऱ्याचदा सोशल मीडियावर काम करत असताना काही पोस्ट शेअर करत असतो.
कधी शेतात काम करताना, शेतात व्यायाम करतानाचा ही व्हिडियो बऱ्याचदा चर्चेत असतो. आज प्रविणचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजू शेट्टी बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकत्याच त्यांच्या एका पोस्टने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. राजू शेट्टींनी लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडेच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात राजू शेट्टी हे प्रवीण तरडेंना केक भरवताना दिसत आहेत. याला त्यांनी फारच हटके कॅप्शन दिले आहे.
कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन , मोर्चे, पदयात्रा याकाळात गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत असणारे चित्रपटातील यशस्वी शेतक-यांचा मुलगा व अभिनेता प्रविण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी साजरा केला."
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या पुण्यातील घरी लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडेचा वाढदिवस साजरा केला. खरंतर राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील हे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटावेळी प्रवीण तरडेंचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक एका पोस्टच्या माध्यमातून केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.