

Aashika Bhatia Body Shaming Trolling: बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत बॉडी शेमिंग काही नवीन नाही. अनेकदा अभिनेत्रींना सोशल मीडियावर बॉडी शेमिंगवरुन ट्रोल केले जाते. काही अभिनेत्री त्याला सामोरे जातात, तर काही अभिनेत्री या ट्रोलिंगचा सामना न करता आल्याने निराश होतात.
यापैकी एक अभिनेत्री आहे आशिका भाटिया. तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोलर्स 'मोठी म्हैस' म्हणून ट्रोल करायचे. अभिनेत्रीने सांगितले की या सर्व कमेंट्सचा तिच्यावर इतका परिणाम झाला की हे सर्व टाळण्यासाठी तिने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आशिका भाटियाने इंडस्ट्री सोडली?
आशिका भाटिया टेलिव्हिजन वरील बऱ्याच मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एके काळी आशिकाला नेटकरी 'मोठी म्हैस' अशा शब्दात ट्रोल केले होते. पण तिने हार मानली नाही आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली.
रात्रभर वजन कमी करा
अलीकडेच आशिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जेव्हा मी लठ्ठ होते त्यावेळी मला भरपूर ट्रोल करण्यात आले. त्या व्हिडीओमध्ये तिच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकने सर्वांनाच चकित केले आहे. तिने 'फॅट टू फॅब' प्रवास कसा पार केला हे सांगितले. तसे, आशिकाच्या या मोठ्या परिवर्तनासाठी लोकांनी तिला बरेच टोमणेही मारले आहेत.
आशिकाचे इंस्टाग्रामवर 5.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर फॅट आणि बॉडी शेमिंगमुळे नैराश्याला बळी पडणाऱ्या अनेकांसाठी आशिका प्रेरणास्थान आहे. आशिका 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'मीरा', 'परवरिश.. कुछ खट्टी कुछ मिठ्ठी' सारख्या मालिकांमध्ये झळकली होती. याशिवाय आशिकाने 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमान खान आणि सोनम कपूरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत एकाच स्क्रिनवर सुद्धा दिसली होती.
बऱ्याच दिवसांपासून आशिका चित्रपट अथवा मालिकांमध्ये दिसलेली नव्हती, तिचा इंडस्ट्रीतील वावर दिसत नसल्याने तिने इंडस्ट्री सोडली असल्याची चर्चा होत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.