Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांत सिंह राजपूतसाठी साराची भावनिक पोस्ट, दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

Sara Ali Khan Post On Sushant Singh Rajput Death Anniversary: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
Sara Ali Khan Post On Sushant Singh Rajput Death Anniversary
Sara Ali Khan Post On Sushant Singh Rajput Death AnniversaryInstagram
Published On: 

Sushant Singh Rajput Third Death Anniversary: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला. सुशांतच्या अचनाक जाण्यानं जसा त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला, तसाच धक्का त्याच्या लाखो चाहत्यांना सुद्धा बसला. सुशांतच्या आत्महत्येला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट लिहीली आहे.

सुशांतसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री सारा अली खानने सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sara Ali Khan Post On Sushant Singh Rajput Death Anniversary
Dino Morea Spotted At Airport: अभिनेता डिनो मोरिया एअरपोर्टवर फोन मागताना झाला स्पॉट : व्हिडिओ व्हायरल

साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि सुशांतसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत, शेअर केलेले ते नवीन फोटो ‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यानचे होते. एका फोटोमध्ये सारा आणि सुशांत हेलिकॉप्टरमध्ये बसून मागे पाहत असलेला फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही ‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यान चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत.

साराने फोटो शेअर करताना एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले की, “केदारनाथला पहिल्यांदाच जाताना. आम्ही दोघेही शूटिंगसाठी जात होतो. मला माहित आहे, दोघांनाही पुन्हा पूर्वीसारखे वाटणार नाही. पण ॲक्शन, कट, सूर्योदय, नद्या, ढग, तिथला चंद्राचा प्रकाश, केदारनाथ आणि अल्लाह यांच्यामध्ये कुठेतरी तुझे वास्तव आहे, मला माहित आहे. केदारनाथ ते एंड्रोमेडा पर्यंत तू नेहमीच चंद्र ताऱ्यांमध्ये चमकत राहा.

Sara Ali Khan Post On Sushant Singh Rajput Death Anniversary
Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचं पुढे काय झालं? चाहते तीन वर्षानंतरही प्रतीक्षेत

सुशांतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रत्येक व्यक्तीसोबत दिलखुलास पद्धतीने जगणाऱ्या सुशांतने आत्महत्या करण्याचा इतकं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरित आहे. आत्महत्येपूर्वी सुशांतला कोणती चिंता भेडसावत होती? असा प्रश्न आजही सर्वांना पडलेला दिसून येतो.

तो नेमका कोणत्या कारणामुळे नैराश्यात आला?, त्याच्या नैराश्याचे मुळ कारण काय? त्याच्या नैराश्याला नेमकं कोण कारणीभूत आहे? असा आजही सर्वांना प्रश्न पडतो. त्याच्या ‘एम.एस.धोनी’, ‘काय पो चे’ आणि ‘दिल बेचारा’ यासोबत काही चित्रपटातून त्याने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. आजही सुशांतचे चाहते त्याच्या चित्रपटांवर भरभरून प्रेम करतात. (Bollywood Actor)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.