'बिग बॉस मराठी 5' ची (Bigg Boss ) ट्रॉफी सूरज चव्हाणने उचलेली आहे. बिग बॉसमुळे सूरजची लोकप्रियता वाढली आहे. घरात त्यांचे अनेक सदस्यांसोबत चांगले नाते जोडले गेले आहे. जी नाती आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही तो छान निभवत आहे.
नुकताच गुलीगत सूरजचा (Suraj Chavan) वाढदिवस झाला. हा सूरजचा ३० वा वाढदिवस होता. वाढदिवसादिवशी त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव झाला. घरातील सदस्यांनी त्याला फोन देखील केले. असाच एक फोन अंकिता वालावलकर हिने देखील सूरजला केला. यांच्यातील गोड संवाद जाणून घ्या.
अंकिताने (Ankita Walawalkar) सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा अंकिता सूरजला बोली की, "सकाळपासून तुला फोन करत आहे. तर तुझा फोन इतर लोक उचलतात. मला तुझा नंबर दे. मला तुला भेटायचं आहे." यावर सूरज बोलतो की, "मी आहे ना तू कधीही ये... " असा गोड संवाद सूरज आणि अंकितामध्ये होतो. त्यानंतर सूरज अंकितासोबत तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलतो. दाजी विषयी बोलताना सूरज बोला की, "आमच्या दाजींना सांग गाणी चांगली बनवा नाहीतर तुला तिथे येऊन बुक्कीत टेंगूळ हाणेल.." असा मजेशीर संवाद त्यांच्यामध्ये होतो. यापुढे अंकिता बोलते की, "दाजी तुझा फोन ऐकत आहेत ते चांगलीच गाणी करतील." या संवादावरून सूरज आणि अंकिताच नातं किती घट्ट आहे. याचा अंदाज येतो.
अंकिता वालावलकर ही दिग्दर्शक कुणाल भगतला डेट करत आहे. लवकरच ती लग्नबंधनात देखील अडकणार आहे. चाहते अंकिताच्या लग्नासाठी आणि सूरजसोबतच्या भेटीसाठी खूप उत्सुक आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.