'Bigg Boss 18' च्या घरात चाहतने घातली सलमान खानला लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला...

Salman Khan : बिग बॉसच्या घरात यंदा 'वीकेंड वार'ला सलमान खानला प्रपोज करण्यात आले. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Salman Khan
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) 'वीकेंड वार' (Weekend Ka Vaar) कालच पार पडला. हा 'बिग बॉस 18'चा दुसरा 'वीकेंड वार' होता. या वीकेंडला सलमानने घरातील अनेकांची शाळा घेतली तर अनेकांचे कौतुक केले तर भाईजान स्वतः देखील भावुक झालेले पाहायला मिळाले.

सलमान खान (Salman Khan) 'बिग बॉस 18' ची सदस्य चाहत पांडेशी बोलताना दिसले. त्यात चक्क चाहतने (chahat pandey) सलमान खान समोर लग्नाचा प्रस्ताव मांडलेला पाहायला मिळालं. सलमान चाहतला बोलतो की, तू घरात अनेक वेळा बोलते की तुला लग्न करायचे आहे. तर आता तूच सांग तुला कसा मुलगा हवा आहे तो. त्यावर चाहत बोलते की, मला करणवीर सारखा फिट राहाणारा मुलगा हवा म्हणून...करणवीरचे नाव ऐकून सगळे घरातील सदस्य हसू लागतात. तेव्हा परत चाहत सलमान खानला म्हणते की, सर तुम्हीच माझ्याशी लग्न करा. यावर सलमान बोलतो की, "तू सांगितलेले गुण माझ्यात नाहीत आणि मला तुझ्या आईसोबत जमणार नाही."

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून हेमा शर्माला बाहेर जावे लागले. या आठवड्यात घरातील सदस्य कसा कॅप्टन्सी टास्क खेळणार आणि या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सदस्यांनी मोठा राडा घातला. अविनाश आणि करणवीरमध्ये भांडणे झाली. आता या आठवड्यात नवीन कोणते वाद होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Salman Khan
Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक! 'या' अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com