Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये दहीहंडीचा जल्लोष; जयदीप फोडणार शिर्के पाटीलांची मानाची हंडी

Dahi Handi Celebration In Marathi Serials: मालिकेतील कलाकार हंडी फोडायला सज्ज झाले आहेत.
Mandar Jadhav Celebrating Dahi Handi
Mandar Jadhav Celebrating Dahi HandiSaam TV
Published On

Sukh Mhanje Nakki Kay Asta Dahi Handi Celebration:

श्रावण सुरू झाला की सर्व सणांची सुरुवात होते. नागपंचमी, रक्षाबंधन असे एका पाठून एक सण येत असतात. या सणांचा आनंद मराठी मालिकेत देखील पाहायला मिळतो. सगळीकडे गोकुळाष्टमी धूम आहे. तर मालिकेत कलाकार हंडी फोडायला सज्ज झाले आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप म्हणजे अभिनेता माधव जाधवचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधव जाधव हंडी फोडताना दिसत आहे.

Mandar Jadhav Celebrating Dahi Handi
HBD Rakesh Roshan: राकेश रोशनच्या चित्रपटांची नावे 'K'वरून का? हे आहे कनेक्शन

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला जयदीप झपाझप थरावर चढताना दिसत आहे. वरच्या ठरला गेल्यावर तो हंडी फाडतो.

त्यानंतर या सीनचे बीटीएस या व्हिडीओमधून शेअर केले आहेत. ज्यात जयदीपच्या सुरक्षेची कशी काळजी घेतली हे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर त्याला क्रेनला लटकवून काही शॉट्स घेण्यात आले आहेत. (Serial)

जयदीपचं दहीहंडीचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. प्रेक्षक कमेंट करून या भाग बघण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगत आहेत. कमेंटच्या माध्यमातून माधवचे कौतुक करत आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com