बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांचा ६ सप्टेंबरला वाढिदवस आहे. राकेश रोशन यांचा जन्म १९४९ साली मुंबईत झाला. अभिनयापासून करियरची सुरुवात केलेल्या राकेश रोशन यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात देखील नाव कमावले आहे.
1970 मध्ये आलेल्या 'घर घर की कहानी' या चित्रपटातून राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. राकेश रोशन 1970 ते 1989 या काळात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या उत्तम अभिनेत्याने नंतर त्याचे नशीब दिग्दर्शनात आजमावले आणि यात ते यशस्वी देखील झाले.
राकेश रोशन यांनी 'खुदगर्ज' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला आला होता. जर तुम्ही लक्षपूर्वक पहिले असेल तर तुम्हाच्या लक्षात आले असेल की, दिग्दर्शक राकेश रोशनच्या चित्रपटांची नावे फक्त 'K' ने सुरू होतात. यामागे एक भारी किस्सा आहे. चला जाणून घेऊया या 'के'ची कहाणी.
अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू किंवा सेलेब्रिटी काहीतरी सुपरस्टीशन फॉलो करत. एकदा तास केल्याने त्यांना यश मिळालेलं असत आणि ती प्रथा ते पुढे सुरू ठेवतात. असंच काहीसं राकेश रोशन यांच्याबाबतीत देखील झालं.
राकेश रोशन 1984 मध्ये आलेल्या 'जाग उठा इंसान' या चित्रपटामध्ये बीजी होते. तेव्हा त्यांच्या एका चाहत्याने त्यांना पत्र पाठवून सांगितले की, तुमच्या सर्व चित्रपटांच्या नावांची सुरुवात 'के' पासून करा. मात्र, त्यानंतर त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर 1986 मध्ये 'भगवान दादा' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही.
तेव्हा राकेश रोशन यांनी चाहत्याने लिहिलेल्या पत्राचा विचार केला. त्या पत्रात त्या चाहत्याने त्यांना 'खूबसूरत', 'खट्टा मीठा', 'कामचोर' आणि 'खानदान' सारख्या त्यांच्या सर्व सुपरहिट चित्रपटांच्या नवे 'के' अक्षरापासून सुरू झाले असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर राकेश रोशन त्यांनी त्यांच्या 1987 मध्ये आलेला 'खुदगर्ज' या सुपरहिट चित्रपटाचे नाव 'के'वरून ठेवले. आणि पुढील सर्व चित्रपटांची नावे देखील याच काशरावरून ठेवली. (Latest Entertainment News)
'खून भरी मांग', 'काला बाजार', 'किशेन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना.. प्यार है', 'कोई.. मिल गया', 'क्रिश', क्रिश ३ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. यामुळे राकेश रोशन यांचा विश्वास आणखी दृढ झाला.
राकेश रोशन यांचे 'के'पासून सुरू होणारी तब्बल 50 चित्रपट आहेत. याविषयी बोलताना राकेश रोशन म्हणाले होते की, 'के' पासून सुरु होणाऱ्या बहुतेक चित्रपटांनी यश मिळवले आहे. त्यामुळे मी 'के'ला चिकटून राहण्याचा विचार केला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.