Marathi Movie: ‘सुधा - विजय १९४२’: प्रेम आणि स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी लवकरच पडद्यावर, चित्रपट कधी होणार रिलीज

New Marathi Movie: "सुधा - विजय १९४२" ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.
Entertainment News
Marathi MovieSaam Tv
Published On

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचे बंधू भूषण पोपटराव मंजुळे आता "सुधा - विजय १९४२" ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.

Entertainment News
Pushpa 3 Rampage Release Date : कधी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 3'? निर्मात्यांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले..

वरुणराज मोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य सिनेमा अनुभव ठरणार आहे. सैराट, घर बंदूक बिर्याणी, झुंड, फँड्री यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय व कास्टिंगसाठी ओळखले जाणारे भूषण मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते म्हणून पुढे आले आहेत.

या चित्रपटाची निर्मिती श्री. शिव लोखंडे आणि सौ. सरिता मंजुळे यांनी केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कथा निवडी आणि दर्जेदार सिनेमा निर्मितीमुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे , तसेच हा चित्रपट रुमीर प्रॉडक्शन आणि व्ही स्क्वेअर एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने तयार होत आहे.

मंजुळे बंधू त्यांच्या परिपूर्ण कास्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण असतील यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. भूषण यांनी यापूर्वीही नव्या कलाकारांना मोठ्या संधी दिल्या आहेत,

"सुधा - विजय १९४२" या शीर्षकावरूनच कळते की हा चित्रपट १९४२ सालात घडतो. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची आणि त्याच्या अढळ प्रेमकथेची हृदयस्पर्शी कहाणी सांगतो.या पोस्टरमध्ये त्या काळाची झलक आणि चित्रपटातील भावनिक गुंतवणूक दिसून येते. आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Entertainment News
मार्टिन गॅरिक्सचा दमदार कॉन्सर्ट; ३०० ड्रोन, ४५ हजार पेक्षा जास्त प्रेक्षक, अन् अरजीत सिंगचं सरप्राइज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com