Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

Serial TRP: स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’ या मराठी वाहिन्यांमधील मालिकांच्या टीआरपी स्पर्धेत यंदाच्या आठवड्यातही चांगलीच चुरस पाहायला मिळाली. यामध्ये 'ठरलं तर मग' मालिकेला सर्वाधिक टीआरपी मिळाली आहे.
Serial TRP
Serial TRPSaam Tv
Published On

Serial TRP: ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’ या मराठी वाहिन्यांमधील मालिकांच्या टीआरपी स्पर्धेत यंदाच्या आठवड्यातही चांगलीच चुरस पाहायला मिळाली. गेल्या अनेक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावणारी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने यंदाही ९.१ TVR सह पहिल्या क्रमांकावर स्थिरावली आहे. रोमँटिक कथानक, नात्यातील गुंतागुंत आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे प्रेक्षकांचा या मालिकेला कायम पाठिंबा मिळतो. दुसऱ्या स्थानावर ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका असून, तिच्या कथेत अलीकडेच आलेल्या ट्विस्टमुळे ही मालिका चर्चेत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर अद्वैत आणि कलाची कहाणी सांगणारी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका असून, तिच्यातील कौटुंबिक भावना, संघर्ष आणि प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावते आहे. चौथ्या स्थानावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे, ज्यात रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्या जोडीने एक ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कथा मांडली आहे. पाचव्या स्थानावर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका असून, ही मालिका तिच्या रहस्यपूर्ण कथानकामुळे ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते आहे.

Serial TRP
Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

दुसरीकडे ‘झी मराठी’ वाहिनीवर अलीकडेच सुरू झालेली ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली असून, या आठवड्यात तिने टीआरपीत ३.६ TVR चा आकडा गाठत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आणि मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीच्या नैसर्गिक अभिनयामुळे या मालिकेला लोकप्रिय होत आहे. ‘कमळी’नंतर दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ‘पारू’ आहे. चौथ्या क्रमांकावर रहस्यप्रधान मालिका ‘देवमाणूस’ आहे, तर पाचव्या स्थानावर ‘शिवा’ ही मालिका आहे, जी काही दिवसांपूर्वीच संपली असली तरी तिचे पुनर्प्रसारणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

Serial TRP
Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

या टीआरपी यादीतून स्पष्ट होतं की, प्रेक्षकांची आवड ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हृदयस्पर्शी कथा, कौटुंबिक नाट्य आणि रहस्यपूर्ण अशा विविध प्रकारच्या विषयांकडे अधिक कल आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘कमळी’ या दोन मालिकांनी आपल्या-आपल्या वाहिन्यांवरील प्रेक्षक पसंती असून पुढील आठवड्यातही त्यांचे हे स्थानावर कायम राहते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com