Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Kriti Sanon Property: क्रिती सॅननने मुंबईत एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे, ज्याची किंमत ७८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
Kriti Sanon Property
Kriti Sanon PropertySaam Tv
Published On

Kriti Sanon Property: अभिनेत्री क्रिती सॅननने मुंबईतील पाली हिल परिसरात एक आलिशान डुप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केला आहे. या डुप्लेक्स पेंटहाऊसची किंमत ७८.२० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. हा पेंटहाऊस मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील सुप्रीम प्राण रेसिडेन्शियल टॉवरमध्ये आहे तेही समुद्राभिमुख आहे.

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, हा पेंटहाऊस १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर आहे. त्याचे क्षेत्रफळ ६,६३६ चौरस फूट आहे. यासोबतच, क्रिती सॅननला वरच्या मजल्यावर १२०९ चौरस फूट टेरेस देखील मिळाला आहे. याशिवाय, तिला ६ पार्किंग स्लॉट देखील देण्यात आले आहेत.

Kriti Sanon Property
Smart Wife: चाणक्य नीती नुसार स्मार्ट पत्नीमध्ये असतात 'या' सवयी

क्रिती सॅननने पेंटहाऊससाठी ८४.१६ कोटी रुपये दिले

क्रिती सॅननने या पेंटहाऊससाठी ३.९१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. अभिनेत्रीने या मालमत्तेसाठी जीएसटीसह एकूण ८४.१६ कोटी रुपये दिले आहेत. क्रिती सॅननने हा पेंटहाऊस तिच्या आणि तिच्या आईच्या नावावर खरेदी केला आहे. २०२४ मध्ये, क्रिती सॅननने मुंबईजवळील अलिबागमध्ये २ हजार चौरस फूटचा प्लॉट देखील खरेदी केला होता. याशिवाय, वांद्रे पश्चिममध्ये ४ बीएचके अपार्टमेंट देखील खरेदी करण्यात आले होते. वृत्तानुसार, त्याची किंमत ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Kriti Sanon Property
Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

क्रिती सॅननची एकूण संपत्ती आणि व्यवसाय

सीएनबीसीनुसार, क्रिती सॅननची एकूण संपत्ती आणि इतर मालमत्तांबद्दल बोलायचे झाले तर, तिची एकूण संपत्ती सध्या ८२ कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधी रुपये कमावते. तिने अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. क्रिती सॅननचा स्किन केअर ब्रँड, कपड्यांचा ब्रँड आणि फिटनेस प्लॅटफॉर्म देखील आहे, ज्यामुळे तिला चांगलाच फायदा होतो. याशिवाय, तिचे 'ब्लू बटरफ्लाय फिल्म्स' नावाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com