Toxic First Look: 'रॉकी भाई'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, यशच्या 'टॉक्सिक'चा फर्स्ट लूक आऊट

Yash 19 Revealed Next Film Toxic First Look: यश त्याच्या पुढच्या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गीतू मोहनदाससोबत काम करणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये फ्लोरवर जाईल.
Toxic First Look
Toxic First LookSaam Tv
Published On

South Superstar Yash Film:

'KGF' आणि 'KGF 2' च्या ऐतिहासिक यशानंतर (Yash 19) साऊथचा प्रसिद्ध अभिनेता यश आणखी एक जबरदस्त चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून यशच्या नव्या चित्रपटाची चर्चा होती. पण हा चित्रपट कोणता असणार आहे याची माहिती समोर आली नव्हती. अखेर यशने चाहत्यांना आज गुडन्यूज दिली आहे. यशने त्याच्या आगामी चित्रपटाची (Toxic First Look) घोषणा केली आहे.

यशने त्याचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक'चे (Toxic Movie) नाव आज सोशल मीडियावर पोस्ट करत एका व्हिडिओद्वारे घोषित केले आहे. यश त्याच्या पुढच्या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गीतू मोहनदाससोबत काम करणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये फ्लोरवर जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कन्नड अभिनेता यशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. यशच्या आगामी चित्रपटाचे नाव 'टॉक्सिक' आहे. यशने इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाच्या नावावरील पडदा काढला आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. साई पल्लवी या प्रकल्पाचा एक भाग असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन करणार आहे. यश सप्टेंबरमध्ये चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन कामासाठी लंडनला गेला होता.

यशने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ पोस्ट करत चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, 'तुम्ही जे शोधता ते तुम्हाला शोधत आहे - रुमी. प्रौढांसाठी एक परीकथा #TOXIC.' व्हिडीओमध्ये चित्रपटातील अभिनेत्याच्या डोक्यावर टोपी आणि तोंडात सिगार घातलेल्या लूकची झलक सर्वांना पाहायला मिळते. व्हिडीओसह चित्रपटाचे नाव रिव्हिल करत निर्मात्यांनी हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची देखील घोषणा केली.

Toxic First Look
Fighter Teaser: 'फायटर'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज, हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या लव्ह केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

'टॉक्सिक' हा चित्रपट गोव्यात कार्यरत असलेल्या ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक अॅक्शनपॅक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट खूप मोठ्या बजेटमध्ये बनणार असल्याचे देखील सांगितले आहे. केव्हीएन प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दरम्यान, यशराजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो KGF चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये देखील दिसणार आहे. KGF आणि KGF 2 च्या यशानंतर हा या चित्रपटाचा तिसरा भाग असणार आहे. या व्यतिरिक्त यशला नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटासाठीही साइन करण्यात आले आहे. तो रावणाच्या भूमिकेत तर रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे.

Toxic First Look
Bigg Boss 17: ...तर मी तुला सोलून काढलं असतं, अभिषेक कुमारवर का संतापला सलमान खान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com