धर्मेंद्र, धरम, धरमपाजी अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांचा आज ८९वा वाढदिवस. कायमच धर्मेंद्र यांच्या अभिनयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा व्हायची त्यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटलं जातं. पण त्या महानायकाला घडवण्यामध्ये, धर्मेंद्र देओल यांचा मोठा मोलाचा वाटा होता. धर्मेंद्र यांच्या या मेहनतीने आणि दमदार अभिनयाने त्यांना आज दिग्गज अभिनेता बनवलं आहे.
धर्मेंद्र आपल्या आईच्या खूप जवळचे होते, आईच्या सल्ल्यानुसार, धर्मेंद्र यांनी फिल्मफेअरच्या न्यू टॅलेंट हंटसाठी अर्ज केला होता. फिल्मफेअर मॅगझिन नॅशनल न्यू टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना आपल्या आगामी चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. अर्जुन हिंगोरानीने धर्मेंद्रला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटात कास्ट केले होते. या पहिल्या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना ५१ रुपये इतकी फी मिळाली.
त्यांनी पहिल्या चित्रपटाबद्दलची रंजक कथा ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये सांगितली होती. धर्मेंद्र म्हणाले, ‘मला प्रोड्युसरच्या केबिनमध्ये बोलावण्यात आले. पहिल्याच चित्रपटासाठी मला किती मानधन मिळणार?, असा माझ्या मनात प्रश्न होता. तिथे काही लोकं होते. त्यांनी प्रत्येकाने आपल्या खिशातून १७ रुपये काढले. आणि मला ५१ रुपये दिले. मला मिळालेले ते मानधन मी कधीही विसरु शकत नाही.’
धर्मेंद्र यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. धर्मेंद्र यांनी १९६०मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेक दिग्गज कलाकार असताना देखील धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली हक्काची जागा निर्माण केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.