साम टिव्ही ब्युरो
सध्या बॉलिवूड अभिनेत्री सतत डीपफेकला बळी पडत आहेत. ज्यामध्ये AI च्या मदतीने त्यांचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्याने मॉर्फ करून व्हायरल केला जात आहे.
कधीकधी एखाद्या सेलिब्रिटीच्या चेहऱ्याशी किंवा आवाजाशी छेडछाड करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जातो. या प्रकरणात आता वाढ होताना दिसत आहे.
सर्वात आधी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना डीपफेकची पहिली बळी ठरली. यानंतर कतरिना कैफ, काजोल आणि आलिया भट्टसारख्या अभिनेत्रीही त्यातून सुटू शकल्या नाहीत.
आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील डीपफेकची शिकार झाली आहे. तिचा एक फेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तिचा चेहरा नाही तर आवाजात छेडछाड करण्यात आली आहे.
या व्हिडीओत ती एका ब्रँडचे प्रमोशन करताना दिसत आहे. या मॉर्फ केलेल्या व्हिडीओमध्ये प्रियंका बोलत असलेले शब्द बदलण्यात आले असून तिच्या आवाजाशी छेडछाड करण्यात आली आहे.
या व्हिडीओमध्ये प्रियांका बोलताना दिसत आहे की, 'मी 2023 मध्ये 1 हजार लाख रुपये कमावले आहेत. मी चित्रपट आणि गाणी तसेच अनेक प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले. मी माझी मैत्रीण रुची भल्ला हिलाही या प्रकल्पाबद्दल सुचवू इच्छिते. यातून तुम्ही दर आठवड्याला ३ लाख रुपये कमवू शकता.'
हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर, तुम्ही खरा आणि खोटा फरक करू शकणार नाही. पण जर तुम्ही अभिनेत्रीचे ओठ नीट पाहिले तर. ती बोलत असलेले शब्द तिच्या आवाजापेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचं दिसतं.