
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Film Industry) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साऊथची प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री कसम्मल (Kasammal) यांची हत्या करण्यात आली आहे. कसम्मल यांच्या मुलानेच त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसम्मल यांचा मुलगा पी. नमकोदीला अटक केली आहे. कसम्मल यांच्या हत्येचे (Kasammal Death) वृत्त कळताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक जण दु:ख व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कसम्मल यांची हत्या करण्यात आली आहे. कसम्मल यांचा मुलगा पी. नमकोदीनेच त्यांची हत्या केली. पी. नमकोदीने कसम्मल यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले होते. त्यांनी पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरामध्ये नमकोदी ने आईला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या कसम्मल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे चाहते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ही घटना मदुराई शहरातील उसिलमपट्टीजवळील अनायरमध्ये घडली. 4 फेब्रुवारीला अभिनेत्री कसम्मल यांचा मृत्यू झाला. कसम्मल यांना काठीने मारहाण केल्याचे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसम्मल यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून कसम्मल यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहेत. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांच्या अहवालानुसार, कसम्मल आणि पी. नमकोदी यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्याचा मुलगा त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. कसम्मल यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात नमकोदीने आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ती मरेपर्यंत तिला मारहाण करत राहिला. ही संपूर्ण घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. घटनेनंतर उसिलमपट्टी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
दरम्यान, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘कदैसी विवसयी’ च्या माध्यमातून कसम्मल यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात विजय सेतुपती आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत होते. एम. मणिकंदानी दिग्दर्शित या चित्रपटात कसम्मल यांनी विजय सेतुपतीच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातीली त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.