Allu Arjun Video : 'इधर झुकना पडेगा...'; मुंबई विमानतळावर अल्लू अर्जुनला काढायला लावला मास्क, पुष्पाची रिॲक्शन व्हायरल

Allu Arjun Airport Video : सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनचा विमानतळावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Allu Arjun Airport Video
Allu Arjun VideoSAAM TV
Published On
Summary

'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओत अल्लू अर्जुन सीआयएसएफ जवानशी बोलताना दिसत आहे.

अल्लू अर्जुनचा व्हायरल व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा आहे.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) कायम आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे चाहते दिवाने आहेत. सध्या अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन आणि सीआयएसएफ जवान पाहायला मिळत आहे. व्हिडीओत नेमकं काय आहे, जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा सीआयएसएफ जवानशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन विमानतळावर सुरक्षा तपासणी करताना स्पॉट झाला आहे. तेव्हा सीआयएसएफ जवान अल्लू अर्जुनची ओळख पटवण्यासाठी त्याला मास्क काढण्यास सांगितताना दिसत आहे. अल्लू अर्जुनने सुरुवातील मास्क काढण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर त्याला मास्क काढावा लागला आहे.

अल्लू अर्जुन विमानतळावर जाण्यासाठी खूप सिंपल लूक केला होता. त्याने पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पॅन्ट परिधान केली होती. डोळ्याला गॉगल आणि तोंडाला मास्क त्याने लावले होते. ज्यामुळे ओळख पटवण्यासाठी त्याला गॉगल आणि मास्क काढण्यास सांगितले. तेव्हा अल्लू अर्जुनने गॉगल काढला आणि त्यानंतर तोंडावरचा मास्क देखील काढला. सुरुवातील अल्लू अर्जुन आपले आयडी प्रूफ देखील दाखवताना दिसत आहे. त्यानंतर त्याला आत सोडण्यात आले. अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुनचा व्हायरल व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा आहे. अल्लू अर्जुनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. काही लोक त्याला ट्रोल करत आहे. "अल्लू अर्जुन सेलिब्रिटी असला तरी नियम सर्वांसाठी सारखेच आहेत." अशा कमेंट व्हिडीओवर येत आहेत. तर दुसरीकडे "झुकेगा नहीं साला " असे म्हणत आहेत. तसेच नेटकरी सीआयएसएफ जवानाच्या कामाचे कौतुक देखील करत आहेत.

Allu Arjun Airport Video
New Marathi Serial : 'स्टार प्रवाह'वर येतेय नवीकोरी मालिका; लोकप्रिय अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत, सिरीयलचे नाव काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com