ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तेलकट त्वचेमुळे अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात.यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही काही घरगुता फेस मास्कचा वापर करुन तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.
बेसन चेहऱ्यावरील तेल शोषून घेते. बेसनात गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा. हे सुकल्यानंतर पाण्याने धुवा.
मुलतानी मातीमुळे त्वचेचे तेलकटपणा कमी होईल. मुलतानी मातीमध्ये गुलाबजल किंवा चंदन मिसळून ते चेहऱ्यावर लावू शकता.
टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळा. हा फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ आणि ऑईल फ्री होईल.
ओट्स बारीक करून दह्यात मिसळा. ते फेसपॅकसारखे जाडसर बनवा आणि नंतर ते चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.
१ चमचा एलोवेरा जेलमध्ये १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.